महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष कविता
विषय÷ माझ्या महाराष्ट्राची व्यथा
किती शूर होता महाराष्ट्र माझा
तलवारीच्या पात्यांसम तळपत होता
लागली दृष्ट कोणाची महाराष्ट्र माझा
थेंब थेंब पाण्यासाठी जळपतो महाराष्ट्र माझा ॥१॥
कुठे हरवले शूर विरत्व
झालो आहोत का षंढ
जाती पातीत रंगलो आम्ही
नाही गर्व करण्यास आम्हांस बंड
॥२॥
गोठले का रक्त आमचे
भष्ट्राचारात बुडलो अंखड
देशभक्ती कोठे गेली नसानसांतली
का थंड पडला महाराष्ट्र ॥३॥
श्वास थिजले का?
का हात निखळले?
काय झाले आम्हासं?
पडलो आम्ही का धरणीवर?
॥४॥
गंजली का तलवार आमची
अत्याचाराचा कहर झाला
राजकारणांची ही अजब कथा
ही माझ्या महाराष्ट्राची व्यथा
॥५!!
श्री.पंकज राजेंद्र कासार काटकर
मु.पो.काटी .ता.तुळजापुर
जि.उस्मानाबाद.
मो.नं.÷ ९७६४५६१८८१.
🌷🌷🌹🌷🌷
*चारोळी*
*महाराष्ट्राची मराठी*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
====================
*नसानसांत आमच्या*
*खेळवितो आम्ही मराठी*
*महाराष्ट्राची लावणी* *ढोलकीवर गातो आम्ही मराठी*
*लाल मातीवरची मर्दानी कुस्ती*
*खेळतो आम्ही मराठी*
*अभंगासह गवळणीही गातो*
*भजनात आम्ही मराठी*
====================
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🌷🌷🌹🌷🌷🌷
*श्री.पंकज राजेंद्र कासार काटकर*
*शिक्षक* *जि.प.उस्मानाबाद.*
0 Comments