तुळजापूर तालुक्यातील वडगाव काटी येथे शालांत परिक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
तुळजापुर :तालुक्यातील वडगाव काटी येथील गावातील महात्मा गांधी विद्यालय मध्ये इयता 10 वी मध्ये गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ दि,१७ रोजी करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव तथा अणदूरचे सरपंच राम दादा आलुरे कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच वडगाव काटी सरपंच सौ पूनम गौरीशंकर कोडगीरे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. यावेळी गौरीशंकर कोडगीरे, संचालक कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणी तुळजापूर, प्रकाश डावरे उपसरपंच,नानासाहेब कदम तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ,अण्णासाहेब नलावडे चेअरमन वडगाव का टी नारायण धावणे , काँग्रेसचे माजी अध्यक्ष शिवाजीराव चूंगे , शामिर पाटील, तुषार धावणे, अयुब पाटील,, श्रीमत् वायकर, सतीश पाटील, सर्व शिक्षकवृंद, व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments