Hot Posts

6/recent/ticker-posts

सर्वसमावेशक पीक विम्याचा १ रु मध्ये लाभ घ्या ! - श्री सतीश कचरे प्र. तालुका कृषी अधिकारी , माळशिरस .

सर्वसमावेशक पीक विम्याचा १ रु मध्ये लाभ घ्या ! - श्री सतीश कचरे प्र. तालुका कृषी अधिकारी  माळशिरस .           


 

नातेपुते : स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवात महाराष्ट्र शासन कृषि विभागाने लोककल्याणकारी योजना मध्ये खरिप व रब्बी अधि घोषीत क्षेत्रामधील अधिघोषीत पिकासाठी १ रु मध्ये सर्वसमावेशक पीक विमा २३ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार लागू केला आहे. या विमाअंर्तगत खालील जोखमीच्या बाबीचा समावेश आहे १ - हवामान घटकाच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्याने होणारे नुकसान .२ - पिकाच्या हंगाममध्ये प्रतिकृल परिस्थितीमुळे होणारे नुकसान .३ - पीक पेरणी ते काढणी पर्यतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज, गारपीठ , वादळ, चक्रीवादळ , पुरक्षेत्र जलमय होणे , दृष्काळ, पावसाचा खंड , भुस्खलन,  किड व रोग  आल्यामुळे होणारे उत्पदनात येणारी घट . ४ - स्थानिक नैसार्गिक अपत्तीमुळे होणारे पिकाचे नुकसान . ५ - नैसर्गिक कारणामुळे पिकाचे काढणी पश्चात नुकसान . या जीखीमुळे होणारे पिकाचे नुकसान व उत्पदनातील घट यावर विमा प्राप्त करणेसाठी लाभार्थीनी - ७ /१२, ८अ , आधारकार्ड व पिकपेरा दाखला सह राष्ट्रीयकृत बॅक' जिल्हा बँक , सीएससी सेन्टर , व पीक विमा पोर्टल वर प्रति हेक्टर १ रु विमा भरावयाचा आहे. विमा प्रिमीअम मधील उर्वरीत राहीलेला हप्ता केंद्र व राज्य शासन भरणार आहे. तरी तालुका कृषि अधिकारी माळशिरस कार्यक्षेत्रातील १२ महसुल मंडळ मधील अधिघोषीत क्षेत्रामधीलअधि घोषीत पिकासाठी ११४ गावतील शेतकरी बाधंवानी खरिप मका, तूर, बाजरी, सूर्यकुल, सोयाबीन , मुग या पिकाचा विमा उतरविणेसाठी व अधिक महितीसाठी नजीकचे कृषि विभाग कार्यालय अधिकारी कर्मचारी यांचे संपर्क करण्याचे अहवान तालुका कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे.

Post a Comment

0 Comments