श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान, तुळजापूर मार्फत अभियांत्रिकी शिक्षणासाठी दिल्या जाणा-या शैक्षणिक सवलत योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा - मा. जिल्हाधिकारी, डॉ. सचिन ओंबासे
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर (प्रतिनधि) : श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान, तुळजापूर मार्फत चालविण्यात येणा-या श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर ची स्थापना सन 1983 साली झाली असून महाविद्यालयाने मागील 40 वर्षापासून ग्रामिण भागामध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्यांमधून उच्च विद्याविभूशित अभियंते निर्माण केले आहेत. मराठवाडा विभागातील ग्रामिण भाग व आसपासचे जिल्हे यामधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गरज लक्षात घेता मा. जिल्हाधिकारी महोदयांनी मागील 3 वर्षापासून श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर गुणवत्तेवर आधारीत शिक्षण फीस सवलत याजेना उपलब्ध करून दिली आहे.
सदर योजनेमुळे मागील 2 ते 3 वर्षापासून ब-याच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना जे की त्यांच्या आर्थीक परिस्थितीमुळे मोठी फीस भरून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणे शक्य नव्हते अशा विद्यार्थ्यांना श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानने जाहीर केलेल्या शैक्षणिक फीस सवलत योजनेमुळे अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण करता आले आहे. श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग व विविध प्रयोगशाळेसह सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्वक शिक्षण दिले जाते. सदरील योजना मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष महोदयांनी शैक्षणिक वर्ष 2023 2024 मधील अभियांत्रिकी प्रवेशासाठी चालू ठेवून खालील प्रमाणे शैक्षणिक फीस सवलत योजना जाहिर केली आहे.
अ.क्र.
1 2
प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी
(sum of percentile of Phy + Chem+Math ) MHT-CET/JEE 175 पेक्षा जास्त 151 ते 175 पर्यंत
3
126 ते 150 पर्यंत
4
100 ते 125 पर्यंत
थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी Diploma Marks
85% जास्त गुण 80% पेक्षा जास्त गुण ते
85% पर्यंत 75% पेक्षा जास्त गुण
ते 80% पर्यंत 70% ते 75% पर्यंत
प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्षामध्ये शैक्षणिक सवलत शुल्कामध्ये सूट
100%
75%
50%
25%
उपरोक्त आर्थीक सवलतींचा गरजू व हुशार विद्यार्थ्यांनी लाभ घेवून श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या पहिल्या व थेट दुस-या वर्षाच्या प्रवेश प्रक्रिमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातील प्रवेश कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा मा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.
0 Comments