प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे वेळेत पूर्ण करा. मा.खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर.
प्रतीनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
धाराशिव : जिल्हा स्तरीय नियंत्रण व समन्वम दिशा समीतीची आढावा बैठक दि, ३ रोजी दुपारी 12.00 वा. मा.खा. श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास मंत्रालय अंतर्गत विविध विभागातील योजनेनाचा आढावा घेण्याकरीता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे वेळेत करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये ग्रामीण भागातील वाड्या तसेच वस्त्यांचा समावेश करण्यात यावा; शहरी व ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन करणे बाबत सूचना करण्यात आल्या. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने साथ रोगांचे तसेच पावसाळ्यातील रोगराईंचे नियंत्रण करण्यासंबंधी आरोग्य विभागास महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या. शेतकऱ्यांना शेताकडे जात असताना किंवा शेतमालाची वाहतूक करताना फार मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावी लागते यासाठी माहात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेत रस्त्याची कामे करणेबाबत तसेच नव्याने प्रस्ताव मागवून मंजूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संजय गांधी निराधार योजना तसेच वृद्ध लोकांचे निवृत्ती वेतन अनेक महिन्यापासून वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सदर प्रकरणांमध्ये लक्ष घालून निराधार, निराश्रित विधवा, एकल महिला यांचे वेतन वेळेत जमा करण्याबाबत संबंधीत विभागास सूचना करण्यात आल्या.
उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी जी जमीन शेतकऱ्यांकडून अधिग्रहण केली जात आहे त्या अनुषंगाने अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. रेडी रेकनरच्या दरानुसार शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा रेल्वे विभाग देणार असल्याचा संशय शेतकऱ्यांना आहे म्हणूण या गोष्टीस शेतकऱ्यांनी विरोध दर्शवील्यामुळे संबंधित संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा हा थेट जमीन खरेदी करून देणेबाबत सूचना करण्यात आल्या. त्यानंतर तुळजापूर औसा महामार्गावरील काक्रंबा येथील ब्रिजचे 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत काम पूर्ण न झाल्यास तुळजापूर औसा महामार्गावरील टोल बंदी करण्यात येईल अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर यांना करून संबंधित पुलाचे काम ठेकेदार कंपनीकडून वेळेत करण्याबाबत सांगण्यात आले. तसेच सोलापूर- धुळे महामार्गावर धाराशिव शहरानजीकची साईड रोडची अपूर्ण कामे 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण न केल्यास येडशी येथील टोल प्लाजा बंद करणार असल्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना आढावा बैठकीदरम्यान ठणकावून सांगितले. त्यानंतर एमसीएस विंग हॉस्पिटलचे काम वेळेवर सुरू करणे बाबत सूचना करून केज ते कुसळंब रस्त्यावरील कळंब शहरानजीक मांजरा नदीवरील अपूर्ण काम व येरमाळा घाटातील रस्ता तात्काळ पूर्ण करणे बाबत संबंधित सूचित करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील पात्र नागरिकांचे घरकुल प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्याबाबत ही सूचना करण्यात आली अपंग नागरिक तसेच निराधार व्यक्ती शासकीय अनुदानापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेणेबाबत सूचित करून सन 2021- 22 हंगामातील उर्वरित पीक विमा मिळवून देणे करिता संबंधित विमा कंपनीवर कारवाई करण्याबाबत कृषी विभागास सूचना करण्यात आले त्यानंतर सदर दिशा बैठकीस गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांनवर कारवाई करणार असल्याचे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बैठकीदरम्यान सांगितले.
0 Comments