Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल, पिके सुकू लागली दमदार पावसाची प्रतीक्षा

धाराशिव जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल, पिके सुकू लागली दमदार पावसाची प्रतीक्षा

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

मागील वीस दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने
खरीप हंगामातील सोयाबीन पीक ऐन बहरात आले असताना पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन पीक धोक्यात येण्याची सध्या तरी चित्र धाराशिव  जिल्ह्यात दिसून येत आहे

धाराशिव प्रतिनिधी: यंदा जिल्ह्यात पेरणी पासूनच पावसाने पाठ फिरवली आहे, अल्प पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या परंतु जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने हिरवीगार दिसत असलेली पिके ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक ठिकाणी पिके माना टाकू लागलेले दिसत आहेत. जिल्हा परिसरात अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली, यानंतर रिमझिम पावसावर पिके तर धरून होती मात्र गत   20 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने अल्पकालीन खरीप पिकाने माना टाकले आहेत. सोयाबीन, मूग ,उडीद या खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

लाखो रुपयाचा खर्च करत पेरणी करून हिरवीगार दिसत असलेली पिके अक्षरशा करपून जात असल्याने शेतकरी हवालदिल  झालेला आहे. ऑगस्ट महिन्याची तीन आठवडे होऊनही वरून राजाने पाठ फिरवली दिसत असल्याने शेतकरी धास्तीने आर्थिक विवंचनेत सापडला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे जळून जात असलेल्या पिकाबरोबर पशुधन सांभाळण्याची मोठी आव्हान शेतकरी यापुढे निर्माण झाला आहे.

पावसाळ्याची सव्वा दोन महिने संपले म्हणजे जवळजवळ अर्धा पावसाळा संपला असून जून महिना पूर्णपणे कोरडा गेला जुलै महिन्यात अल्प थोडाफार पाऊस आला त्यावरच खरिपाच्या पेरणी आटपटल्या, मात्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तर पावसाने कसली हजेरी लावली नसल्याने सध्या परिस्थितीत हलक्या जमिनीतील पिके कोमिजू लागली आहेत, येत्या चार ते पाच दिवसांमध्ये पाऊस नाही आला तर  खरीप हंगामातील पिके हातची जाण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे.

जिल्ह्यामध्ये मागील पंधरा ते वीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत, यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी आपल्या खरीप पिकाला पाणी देणे सुरू केले आहे पण ज्याच्याकडे सिंचन व्यवस्था नाही त्यांची डोळे आभार लागले आहेत.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी एका एकर ला बी बियाणे खत आणि औषधासह मजुरावर जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये खर्च केलेला आहे, हा खर्च कसा भरून निघणार असा प्रश्न पडला आहे. गेल्या जून जुलै ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाला नसल्याने नदी, नाल्या, ओढे बंधारे, कोरडे ठक पडले आहेत.

येणाऱ्या काही दिवसात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यावर डोक्याला हात लावण्याची वेळ येणार आहे याकडे शासन ,प्रशासनाने लोकप्रतिनिधी यांनी लक्ष  देण्याची गरज आहे . एकंदरीत शेतकरी कधी आसमानी, तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत येत आहे त्यामुळे सध्या परिस्थिती मध्ये जिल्ह्यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.



Post a Comment

0 Comments