Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यामध्ये पावसाच्या विश्रांतीमुळे खरीप पिके धोक्यात, जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्नही गंभीर दुष्काळाचे सावट गडद

तुळजापुर तालुक्यामध्ये पावसाच्या विश्रांतीमुळे खरीप पिके धोक्यात, जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्नही गंभीर दुष्काळाचे सावट गडद 

तुळजापुर : तालुक्यात मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आले असून शेतकऱ्यावर गडद दुष्काळाची सावट दिसून येत आहे. यंदा सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जुलै महिन्यामध्ये झालेल्या जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या, मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील पिकांची शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक करपून जात आहे, त्यामुळे तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात संपला आहे.

 'पडला तर मघा नाहीतर ढगाकडे बघा ' ही पारंपरिक म्हण यावर्षी सत्यात उतरली आहे . पावसाने तालुक्यात एक महिन्यापासून दडी मारली आहे ३० ऑगस्ट रोजी हक्काचे नक्षत्र असलेला पाऊस संपवून परतीच्या प्रवासातील पावसाचे नक्षत्र लागत आहेत. यावर्षी  दुष्काळ धोंडा महिना ठरला आहे मागील पाच वर्षे झाली तालुक्यात बळीराजाच्या मागे लागलेले शुक्ल कास्ट संपता संपत नाही, हे दुर्दैव आहे. 

सन 2019 ते 2021 यासाठी अतिवृष्टी गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, तर सन 20 ते 22 या कालावधीमध्ये कोरोनाचे थैमान घातले यामध्ये बळीराजा होरपळून निघाला तर आता 2023 सन पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यात दुष्काळाचे सावट गडद होताना  दिसत आहे.

रोहिणी , मृग ,पुनर्वसु,आद्रा , आश्लेषा, मघा , ह्या हक्काच्या नक्षत्राचा पाऊस संपला आहे. याला महाराष्ट्रात वरती कडील पाऊस म्हणतात , यंदा परिसरामध्ये अत्यल्प कमी पाऊस झाला आहेत, त्यामुळे आता हातात तोंडाशी आलेली पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत , बऱ्याच ठिकाणी पिकांनी माना टाकले आहेत. सोयाबीन, उडीद , मुग , या पिकांची शाश्वती राहिली नाही.

ज्याच्याकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांची पिके तग करून आहेत, मात्र पाणीसाठ्याने तळगाटला आहे, तर ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांच्या पिकांची तर बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे खरिपातील पिके हातून जाण्याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.

30 ऑगस्ट नारळी पौर्णिमा नंतर उरलेल्या पूर्वा नक्षत्राला सुरुवात होईल, खालतीकडील म्हणजेच परतीचा पाऊस सुरू होईल. यामध्ये पूर्वा, उत्तरा ,हस्त, चित्रा व स्वाती नक्षत्र असेल. उत्तरा नक्षत्रात बैलाची एक शिंग भेजते   आणि दुसरे कोरडे राहते असे म्हणतात. कोसळला तर सुपडा साफ करून टाकतो अशी अवस्था तीच अवस्था हस्त नक्षत्राची आहे, एकंदरीत तालुक्यामध्ये आजतागत एकही नक्षत्रामध्ये मोठा पाऊस आला नाही, त्यामुळे येणाऱ्या नक्षत्रात तर मोठा पाऊस येईल आणि रब्बी हंगामात तर पाण्याचा मुबलक साठा होईल या आशेवर बळीराजा बसला आहे, मात्र सद्यस्थिती पाहता तालुक्यामध्ये शेतकऱ्यावर दुष्काळाचे सावट गडद होताना दिसत आहेत.


Post a Comment

0 Comments