Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्यसैनिक संचलित धाराशिव प्रशाला शाळेला राष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळावा : ॲड अजय वाघाळे

स्वातंत्र्यसैनिक संचलित धाराशिव प्रशाला शाळेला राष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळावा : ॲड अजय वाघाळे


----------------- प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव---------------------------------------------

धाराशिव:स्वतंत्र सैनिक संचलित सिद्धेश्वर निवासी विद्यालय वरवंटी धाराशिव या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ऍडव्होकेट अजय वाघाळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक  सारवदे सर तसेच शाळेचे शिक्षक आगळे सर , कांबळे सर , सौ झिंगडे मॅडम,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते , यावेळी अडवोकेट अजय वाघाळे यांनी निजाम कालीन इतिहास व मराठवाडा मुक्ती संग्राम लढा बदल माहिती देताना म्हणाले मराठवाडा मुक्ती संग्राम लढा हा सर्व सामान्य व्यक्तीचा लढा असुन रझाकराने चालवलेल्या जुलमी अन्या-अत्याचार विरुद्धचा 

लढा होता, त्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक शहीद झाले असून अनेक गावे उद्वस्त झाली आहेत, त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते,

चीलवडी, नांदगाव, देवधानोरा, केशेगांव, उपला गावांचा समावेश आहे, या संपूर्ण घटनेल सतरा सप्टेंबरला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत आहोत असे ते म्हणाले, या प्रसंगी त्यांनी मुक्ति लढयाचा इतिहास निविन पिढीला माहिती होण्यासाठी अभ्यास क्रमात देन्यात यावा, त्याचा बरोबर स्वातंत्र्यसैनिक संचलित धाराशिव /प्रशाला या शाळेला राष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळावा ,धाराशिव शहरामध्ये भव्य असे स्वतंत्र सैनिकांचे स्मारक उभे राहावे असेही यावेळी वाघाळे म्हणाले, शेवटी आभार प्रदर्शन कांबळे सर यांनी केले . या कार्यक्रमास शाळेचे  कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

स्वातंत्र्यसैनिक संचलित धाराशिव प्रशाला शाळेला राष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळावा : ॲड अजय वाघाळे

Post a Comment

0 Comments