गोपाल काला म्हणजे जीव शिवाचे ऐक्य : ह.भ.प श्रीराम महाराज भगत नातेपुते
नातेपुते प्रतिनिधी : दहीहंडीचा गोपाळकाल्याचा उत्सव आपली परंपरा श्रद्धा म्हणून आपण आनंदाने साजरा करतो हा उत्सव गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी आपण दहीहंडी तथा गोपालकाळा म्हणून साजरा करतो भगवान श्रीकृष्णांनी वृंदावनात व्रजमंडळात गायी चारतांना स्वतःची व बालगोपालाची शिदोरी एकत्र करून गोपालकाला केला आणि सर्व गोपाळा बरोबर काला ग्रहण केला तोच आजचा गोपालकाल्याचा दिवस गोपाल काला कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी गोपालकाला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा सुरु झाली.
पुढे हाच गोपालकाला सर्व साधुसंतांनी पंढरपूर येथे वाळवंटात सर्वांना एकत्र घेऊन करण्यास सुरुवात केली, पुढे हाच गोपाल काला गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने हा गोपाल काला सुरू झाला, कितीही दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह असू द्या, याची सांगता काल्याच्या प्रसादाने होते लौकिक अर्थाने दही दूध ताक व लोणी चिरमुरे पोहे हे पदार्थ एकत्र कालविणे म्हणजे काला होय, मात्र अलौकिक अर्थाने जीव शिवाचे ऐक्य म्हणजे काला होय.
असा काला जीवनात परमानंदाच्या सुखाची प्राप्ती करून देतो, गोपाळकाला म्हणजे पांढर्या रंगाचा पाच रसात्मक स्वादांचा अधिक अधिक प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा आणि पूर्णअवतारी भगवान श्रीकृष्ण कार्याची दर्शक असलेला समुच्चय काला हा शब्द एक संघ आणि वेगात सातत्य असणाऱ्या क्रियेशी संबंधित आहे, गोपाल काला दहीहंडीच्या वेळी सर्व तरुण मंडळी एकत्र करून एक संघ तयार करून त्यात सहभागी होतात प्रत्येक जातीतील लोकांना एकत्र करून एकता निर्माण करणे ही एकत्रित संघटना निर्माण करणे व आपण सर्व एकच आहोत हे ही दर्शन या उत्सवातून होते. यातून भगवंताने एकतेचे समतेचे शिक्षण दिले हाच आनंदाचा गोपाळकाला होय हा गोपालकाला वैकुंठात देखील दुर्लभ आहे असे साधुसंत सांगतात उच्च नीच जात धर्म भेद मोडून समाजातील प्रत्येक स्तराशी समरस जो होईल त्यालाच काल्याच्या प्रसादाचा आनंद मिळतो.
आणि भगवान श्रीकृष्णाने दाखवलेल्या मार्गावरून आपल्या जीवनाचा प्रवास सुरू झाला की आयुष्यात समतोल साधण्याची कला आपोआप अवगत होते. मग संकटांचा, दुःखांचा, आव्हानांचा कितीही मोठा गोवर्धन कोसळला तरी तो एका करंगळीवर पेलता येतो. अशी शिकवण या ठिकाणी सण उत्सवातून आपल्याला पाहायला मिळते . ह .भ .प.श्रीराम महाराज भगत नातेपुते
0 Comments