रस्त्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी,२० जणा विरुद्ध गुन्हा दाखल, तुळजापुर तालुक्यातील घटनाधाराशिव: तुळजापूर तालुक्यातील वडगाव देव येथे सार्वजनिक सामायिक वापराच्या रस्त्यावरून दोन कुटुंबामध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत १५ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दिनांक २ सप्टेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून एकूण २० जनाविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील वडगाव देव येथील गावातील सार्वजनिक सामायिक रस्त्यावरून येण्या जाण्यावरून बनछेडे कुटुंबामध्ये गेल्या काही महिन्यापासून वाद सुरू होता. याच कारणावरून जुन्या भांडणाचे कुरापत काढून सदरच्या दोन कुटुंबांमध्ये शनिवारी सकाळी तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटाकडून लोखंडी गज, काठी दगड आधीचा वापर करत यात एकूण पंधरा जणांना मारहाण झाली.
या प्रकरणात सचिन लक्ष्मण बनछेडे वय(३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिरु अंबाजी बनछेडे, अंबाजी भिमराव बनछेडे, अप्पाराव धोंडीबा बनछेडे, धोंडीराम गणपती बनछेडे, अमोल धोंडीबा बनछेडे, मंगल धोंडीबा बनछेडे, पुनम गणपती बनछेडे, रतनबाई अंबाजी बनछेडे सर्व रा. वडगाव देव, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांच्या विरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचबरोबर परस्पर विरोधी अमोल धोंडीबा बनछेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनाजी भीमराव बनछेडे , अनिकेत धनाजी बन छेडे, सचिन लक्ष्मण बनछेडे, शिवाजी भीमराव बनछेडे, संतोष कुंडलिक बनछेडे, म्हाळाप्पा शिवाजी बनछेडे, किसन सुभाष सोनटक्के, सुभाष धोंडीबा सोनटक्के, सुनिता लक्ष्मण बनछेडे, सुंदरबाई कुंडलिक बनछेडे, विजया धनाजी बनछेडे, यांच्या विरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments