Hot Posts

6/recent/ticker-posts

होर्टी येथे बैलपोळ्या दिवशी बैल पुढे नेण्याच्या कारणावरून दोघास बेदम मारहाण, नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

होर्टी येथे बैलपोळ्या दिवशी बैल पुढे नेण्याच्या कारणावरून दोघास बेदम मारहाण, नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल


धाराशिव  : तुळजापुर तालुक्यातील होर्टी येथे बैलपोळ्या दिवशी दि,१४ रोजी बैल पुढे येण्याच्या कारणावरून दोघाजणास बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी नळदुर्ग  पोलीस ठाण्यामध्ये संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, चेतन चंद्रकांत राजमाने, पवन बब्रुवान ताटे,  ओम शिवाजी ताटे, मारुती विठ्ठल ताटे,  तुकाराम मुर्टे  सर्व रा. होर्टी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 14 रोजी  होर्टी येथील लक्ष्मी मंदीराजवळ फिर्यादी नामे सौरभ अंगद गायकवाड, वय 24 वर्षे, रा. होर्टी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे बैल घराकडे घेवून जात असताना नमुद आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून तु बैल आमच्या बैलाचे पुढे घेवून जा अशी भांडणाची कुरापत काढून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी लोखंडी रॉड, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांचे मामा प्रमोद दुपारगुडे हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही लाकडाने डोक्यात मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी सौरभ गायकवाड यांनी दि.16.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149, सह अ.जा.अ.ज.प्र.का. कलम 3(1)(आर),3(1) (एस), 3(2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


Post a Comment

0 Comments