Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रा.राजेश भोईटे यांना राज्यस्तरीय संत गाडगे महाराज समाजभूषण' पुरस्कार

प्रा.राजेश भोईटे यांना  राज्यस्तरीय संत गाडगे महाराज समाजभूषण' पुरस्कार

नातेपुते प्रतिनिधी : सृष्टी युवा फाऊंडेशनचे विश्वस्त तांबेवाडी ता. माळशिरसचे सुपुत्र  प्रा.राजेश भोईटे यांना यंदाच्या 'राज्यस्तरीय संत गाडगे महाराज समाजभूषण' पुरस्कारा साठी निवड करण्यात आली आहे. संत गाडगे महाराज विचार मंच(ओतुर) व ज्ञानज्योती फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार  देण्यात येणार आहे. हा सोहळा शनिवारी दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता संत गाडगेमहाराज शिक्षण संकुल  येथे संपन्न होणार आहे

संस्कार मंदिर संचलित कला वाणिज्य विद्यालयाचे  माजी प्रा. राजेश  भोईटे  असून पर्यावरण  क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा.भोईटे यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ शिक्षण तज्ञ मधुकर नवले, जेष्ठ साहित्यिक अनंत कदम, कृषी तज्ञ रश्मी कुमार एब्रोला, जेष्ठ साहित्यिक शोभा तांबे, भगवताचार्य,अर्चना नेवकर संस्थेचे संचालक नितीन पाटील आदी ची प्रमुख उपस्थित राहणार आहे.या सोहळ्याचे मुख्य  संयोजक रणजित पवार आणि कविता काळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments