मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आई भवानी चरणी महाआरती
तुळजापूर - निजाम राजवटीच्या जखड्यातुन हैदराबाद संस्थानमधून मराठवाडा मुक्त करून भारत देशात समावेश करण्यात आला.आज ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १७ सप्टेंबर रोजी सकाळी तुळजापूर येथे धाराशिव जिल्हा तेंग सु डो कराटे असोसिएशन आई श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी महाद्वारासमोर महाआरती करण्यात आली.
तुळजापूर येथे दहावी राज्यस्तरीय तेंग सुडो (कोरियन कराटे) अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत राज्यातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आहेत, विद्यार्थी आणि क्रीडा प्रशिक्षकासह आयोजकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. महाद्वारातून मशाल पेटवून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यत विद्यार्थ्यांना जयघोष करत मार्च काढला.
याप्रसंगी स्पर्धेच्या मुख्य आयोजक शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शामल वडणे पवार, तेंग सु डो स्पोर्टस् फेडरेशन ऑफ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मास्टर रॉकी डिसुझा, महासचिव मास्टर सुभाष मोहिते, जिल्हा अध्यक्ष मास्टर महमदरफी शेख,शाम पवार, सुनिल जाधव, डाॅ सतिश महामुनी, प्रतीक रोचकरी, लखन कदम,दुळाप्पा रक्षे,प्रेम कदम, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
प्रतिदिनी रुपेश डोलारे तुळजापुर
0 Comments