देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या फरार आरोपीस अटक, तुळजापुर पोलिसांची कारवाई
तुळजापुर : तालुक्यातील कामठा शिवारामध्ये जिल्हा परिषद शाळा समोर कामठा येथे गुन्हयातील फरार आरोपी असल्याबाबत गुप्त माहितीदारा मार्फत पोलिसांना माहिती लागली पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक श्री नवनीत काँवत,उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख,पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांची टीम सदर ठिकाणी रवाना झाली . सदर ठिकाणी फरार आरोपी पोलिसांना सापडला पोलिसांनी झाडाझडती घेतली असता पिस्टल गावठी कटटा आरोपीच्या ताब्यात पोलिसांना मिळून आला .
याबाबत अधिक माहिती अशी आहे की तुळजापूर तालुक्यातील कामठा येथील दिनांक 19 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २३२/२०२३ कलम ३,४,२५ शस्त्र अधिनियममधील फरार आरोपी जमीर उर्फ जम्मु शब्बीर सय्यद रा. कामठा ता. तुळजापुर जि. धाराशिव हा कामठा गावात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सपोनि कांबळे सोबत पोलीस देशमुख, पोलिस माळी,पवार यांना कामठा येथे रवाना केले असता जिल्हा परिषद शाळा समोर कामठा येथे गुन्हयातील फरार आरोपी जमीर शब्बीर सय्यद हा मिळुन आला त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ एक लोखंडी धातुचे फिकट काळसर रंगाची देशी बनावटीची पिस्टल गावठी कटटा (अग्नीशस्त्र), तसेच एक पितळी धातुची ७.६ mm व्यास असलेला लांबी २.५ इंच असलेला जिवंतकाडतुस (पिस्टल चा राऊंड) असा मुददेमाल मिळुन आला तो पंचा समक्ष जप्त करुन आरोपी सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे, व त्यास मा. प्रथमवर्ग न्यायालय, तुळजापुर यांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे .सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे हे करीत आहेत.
प्रतिनिधी रूपेश डोलारे धाराशिव
0 Comments