Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध संघाचे कार्यक्षेत्रात जनावरांसाठी चारा मुरघास / कुट्टी उपलब्ध करुन देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध संघाचे कार्यक्षेत्रात जनावरांसाठी चारा मुरघास / कुट्टी उपलब्ध करुन देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

धाराशिव :  तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित धाराशिव या जिल्हास्तरीय संस्थेमार्फत दुध संकलन वितरणाचे कामकाज सुरु आहे. मात्र सध्याच्या नैसर्गीक परिस्थितीमुळे शेतकरी चारा, पाणी, व पशुखाद्य अभावी मेटाकुटीला आलेला आहे.  धाराशिव हा आकांक्षीत जिल्हा असुन शेतकरी कष्टक-यांना दुग्ध उत्पादनाशिवाय दुसरा ठोस पर्याय नाही मात्र सध्याच्या आवर्षनामुळे जिल्हयात चारा पाणी व खुराकाची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हयात सरासरीपेक्षा फारच कमी पाउस झाल्यामुळे जनावरे जगवणेचे फार मोठे आव्हान शेतक-यांपुढे उभे आहे. परिणामी जिल्हयात शेतकरी शेतमजुरांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.

तरी या टंचाईचा विचार करुन जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात तहसिल कार्यालयामार्फत शेतक-यांना चारा (मुरघास / कुट्टी) उपलब्ध करुन शेतक- यापर्यंत पोहोच करण्याची व्यवस्था करावी तसेच सर्व शेतक-यांचे ५ लाखापर्यंतचे कर्ज माफ करावे जेणेकरुन शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होईल व त्यांना दिलासा मिळेल अन्यथा पशुधन झपाटयाने कमी होवून शेतकरी शेतमजुर कंगाल होईल कृपया या सर्व बाबींचा विचार करुन त्वरीत चारा ( मुरघास / कुट्टी) उपलब्ध करुन देवून कर्ज माफी द्यावी तसेच सध्या कार्यरत असलेल्या दुध सहकारी संस्थेमार्फत सदर योजना राबविण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर चेअरमन बाळासाहेब शिंदे यांची स्वाक्षरी आहे.यावेळी संचालक प्रशांत पाटील,अंकुश पाटील, मोहन लोमटे,कांताबाई भुजबळ, सुनिल नकाते, रामेश्वर वैद्य,बापूराव शेंडगे, कल्याण घरवुडवे, तसेच माजी चेअरमन अशोक तांबारे हजर होते,संस्था प्रतिनिधी पी एस सुरवसे, दत्ता बागल,सुनिक वाकुरे,हमीद पठाण नवनाथ नांगरे, संतोष आतकरे,एच एम लोमटे,संतोष अतकरे,नागनाथ कोले आदी उपस्थित होते.

⛔प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव 

👇👇👇👇👇👇

https://www.balaghatnewstimes.com/2023/09/devendra-jhala-customs-officer-from.html

Post a Comment

0 Comments