Hot Posts

6/recent/ticker-posts

ढोकी येथील सौ.स्नेहलता देशमुख विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा |Dhoki

ढोकी येथील सौ.स्नेहलता देशमुख विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा 

धाराशिव - तालुक्यातील ढोकी येथील सौ.स्नेहलता देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जी. कळकुंबे  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिजामाता शिक्षण संस्था ढोकीचे सचिव पांडुरंग देशमुख व  माजी सैनिक सुभेदार सुधाकर उत्तरेश्वर पाटील उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामबाबत माहिती सांगितली. तसेच श्री. पाटील यांनी राष्ट्र रक्षणासाठी 28 वर्ष मराठा बटालियनचे नेतृत्व केले होते. सेवेत असतानाचे सर्व प्रसंग व स्वतः भारत पाकिस्तान युद्धात सहभागी असलेले प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रहितासाठी आपली ध्येय निश्चित करावेत. आरोग्याबाबत काळजी घ्यावी असे विविध कानमंत्र दिले.

संस्थेचे सचिव पांडुरंग देशमुख यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामतील ढोकी गावातील स्वतंत्र सेनानी त्यांची माहिती तसेच निजाम राजवटीतील संस्थान बाबत माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रशालेतील सहशिक्षक एम.आर.चव्हाण, डी. एस.कुरुळे, ए. ए. कोतवाल, एन. पी . देशमुख  पी. एस. गोळे, एस. एस. पुंड,  बी. एस. कांबळे, . पी. व्ही. गायकवाड, बी. व्ही. पाळवदे तसेच शिक्षकेतर कर्मचारी बी. एस. मुळे,  वाय. बी. कांबळे , श्रीमती घोटकर .उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस.कुरुळे,  यांनी केले. तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक एस. जी. कळकुंबे  यांनी केले.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापुर 

Post a Comment

0 Comments