तुळजापुर येथे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या घरातील, शिवराज्याभिषेक सोहळा देखाव्याचे उद्घाटन तुळजापुर : सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री महालक्ष्मी श्री गणपती समोर सादर करण्यात आला, इतिहासातील सोनेरी क्षण छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या घरातील देखाव्याचे उदघाटण शहरातील पत्रकार बांधवांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
मागील वर्षी शिवोजन्मोत्सवाचे आजोजन केले होते. या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यअभिषेक देखावा सादर केला सदरील देखाव्याच्या अनुशंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सदरील देखावा हा सौ पल्लवी सचिन रोचकरी यांनी तयार केला आहे. सदरील उदघाटन सोहळ्यास माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,युवा नेते विनोद गंगणे,रुग्ण कल्याण समीती सदस्य आनंद कंदले,शहाजी भांजी,बालाजी मोरे,हणमंत पुजारी आदी उपस्थित होते.
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी रुपेश डोलारे
0 Comments