भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने धाराशिव शहरात स्वच्छता अभियान संपन्न
धाराशिव: राष्ट्रपिता महात्मा गांधी व कर्तव्यदक्ष पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजींच्या जन्मदिना निमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात ,धाराशिव शहरात धारासूर मर्दिनी देवी मंदिर येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवले गेले ,यावेळी मंदिर परिसराची पूर्ण स्वच्छता करून ,देवीस मा नरेंद्रजी मोदी यांच्या उदंड आयुष्यासाठी व ते करत असलेल्या राष्ट्रकार्यास आशीर्वाद देऊन पाठबळ देण्याचे साकडे या प्रसंगी घातले .
यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर ,मा उपनगराध्यक्ष अभय इंगळे ,नगरसेवक बापू पवार ,दत्ता पेठे ,विलास लोंढें ,किशोर पवार ,सफाई कर्मचारी यांच्यासह भाजयुमो कार्यकर्ते उपस्थित होते .
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
0 Comments