तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी देवीच्या नवरात्र महोत्सवास रविवारी घटस्थापनेने प्रारंभ
चिवरी: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला रविवारी दि,१५ रोजी घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. नवरात्र महोत्सवासाठी चिवरी नगरी सज्ज झाली आहे. महालक्ष्मी मंदिर बालाघाटच्या पायथ्याला निसर्गाच्या सानिध्यात नळदृर्ग पासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर आहे. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी वर्षभर राज्यभरातून लाखो भक्तगण येत असतात,महालक्ष्मी मंदीरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असतो, त्या पार्श्वभूमीवर आठवडाभरापासुन मंदिराचा परिसर स्वच्छता करण्यात आली आहे, मंदिर आवारातील प्रकाश व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, रंगरंगोटी आदी करण्यात आले आहे. मंदिरावर नवरात्र महोत्सव निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून देवीस ओळखले जाते. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्र महोत्सव काळात देवीला परंपरेनुसार विधीवत पूजा केली जाते,तर विजयादशमीच्या दिवशी देवीची पालखी छबिना मिरवणूक काढून नवरात्र महोत्सवाची सांगता होते.
0 Comments