Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील माळुंब्रा व पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको, तहसीलदार यांना निवेदन

तुळजापुर तालुक्यातील माळुंब्रा व पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको, तहसीलदार यांना निवेदन 

तुळजापूर: संघर्ष योद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्याने स्वतः उपचार करून घ्यावेत यासाठी तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा व पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्याबाबतचे तुळजापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की श्री मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसले असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे आहे, मात्र श्री जरांगे पाटील  स्वतःवर  उपचार करून घेण्यास तयार नाहीत, आरक्षण तर मराठ्याला मिळणारच आहे, मात्र गड आला पण सिंह गेला अशी स्थिती होऊ नये यासाठी श्री जरांगे पाटलांनी स्वतःवर उपचार करून घ्यावेत ही आमची कळकळीची विनंती आहे.

या संदर्भात आमच्या सकल मराठा समाजाच्या भावना श्री जरांगे पाटील यांच्यापर्यंत व श्री जरांगे पाटील यांनी स्वतः उपचार करून घ्यावेत अन्यथा आज दिनांक ३०.१०.२०२३ रोजी सायंकाळी सात वाजेपासून मोजे माळुंब्रा तालुका तुळजापूर आधी सकल मराठा समाज सहकुटुंब  रा.म. मार्ग 52वर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत, सदरील भावनेचा श्री मनोज जरंगे पाटील यांनी आदर करावा ही विनंती असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर 

Post a Comment

0 Comments