धाराशिव तालुक्यामध्ये २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२३
गैरहजर,स्थलांतरित व दुबार मतदारांची सुनावणी
रहिवासी पुरावे व म्हणणे दाखल करण्याची शेवटची संधी
धाराशिव दि.२२ : धाराशिव तालुक्यातील ज्या मतदारांचे नाव धाराशिव तालुक्यातील ३६२ यादी भागांमध्ये समाविष्ट आहे,अशा सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की, भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार सद्यस्थितीत संपुर्ण धाराशिव जिल्हामध्ये मतदार पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
त्यानुसार धाराशिव तालुक्यामध्ये १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारांचे छायाचित्रासह पुनरिक्षण कार्यक्रम
राबविण्यात आला.या पुनरिक्षण कार्यक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना गैरहजर,स्थलांतरीत,मयत,दुबार असे मतदार या यादी भागामध्ये आढळून आले आहे.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० व मतदार नोंदणी नियम १९६० मधील कलमान्वये जे मतदार गैरहजर, स्थलांतरीत,मयत व दुबार आढळून आलेले आहेत,अशा मतदारांचे नाव वगळण्यासाठी त्यांना त्यांच्या मतदार यादीतील पत्त्यावर नोटीस बजावणी करण्यात आली आहे.
संबंधित मतदार सर्वसाधारण मागील 6 महिन्यापासून सदरच्या पत्त्यावर राहात नसल्यामुळे ही नोटीस संबंधित मतदाराला प्राप्त न झाल्याने त्या मतदाराला आपले लेखी म्हणणे सादर करण्याची अंतिम संधी मिळावी यासाठी हे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
धाराशिव तालुक्यात ज्या मतदारांची नोंदणी आहे तसेच ज्यांचे नाव मतदार पुनरिक्षणांमध्ये गैरहजर, स्थलांतरीत किंवा दुबार अशा मतदारांमध्ये आलेले आहे,अशा मतदारांची यादी गावपातळीवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडून तसेच विशेष ग्रामसभा घेऊन मतदार यादीचे वाचन करून जाहीर प्रसिद्धी देण्यात आली आहे. त्याची प्रत जिल्हा संकेतस्थळ www.osmanabad.gov.in यावर प्रसिध्द करण्यात आली आहे.अशा गैरहजर,स्थलांतरीत किंवा दुबार मतदारांच्या सुनावण्या २८ नोव्हेंबर २०२३ ते २ डिसेंबर २०२३ या
कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. त्यावर त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहेत.धाराशिव तालुक्यातील सर्व मतदारांना सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार धाराशिव यांनी जाहीर आवाहन केले आहे की, ज्या मतदारांची नावे गैरहजर, स्थलांतरीत,दुबार मतदारांच्या यादीमध्ये समाविष्ट आहेत,त्यांनी वेळापत्रकानुसार सुनावणीसाठी संबंधीत अधिकारी यांचेसमोर तहसिल कार्यालय धाराशिव येथे वैयक्तिकरित्या अथवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत हजर राहून रहिवासी पुरावे व आपले म्हणणे मांडावे.मतदारांसाठी ही सुनावणीची अंतिम संधी आहे.याची सर्व मतदारांनी गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी.असे धाराशिव तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी कळविले आहे.
0 Comments