शिवक्षेत्र बामणी ते शिवक्षेत्र कपिलधार पायी दिंडी सोहळा चे धाराशिव मध्ये मोठ्या उत्साहा मध्ये स्वागत
धाराशिव: आज धाराशिव मध्ये बामणी ते कपिलधार गुरुराज माऊली च्या जय घोषात श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी माऊली यांची पायी पालखी दिंडी च्या पालखी चे मोठ्या उत्साहाने वीरशैव जंगम मठा मध्ये वीरशैव जंगम मठ ट्रस्ट धाराशिव चे अध्यक्ष शिवानंद कथले, वैजिनाथ गुळवे,बसवेश्वर पतसंस्थे चे अध्यक्ष श्रीकांत साखरे, सागर मैराण यांनी स्वागत केले..या वेळी वीरशैव जंगम मठा मध्ये शि.भ.प.जगन्नाथ क्षिरसागर यांचे परम रहस्य ग्रंथावर प्रवचन झाले. या वेळी श्री ची आरती वीरशैव जंगम मठ ट्रस्ट धाराशिव चे अध्यक्ष शिवानंद कथले, व दिलीप गुळवे दाम्पत्य यांच्या हस्ते करण्यात आली. प्रसादाचा कार्यक्रम होऊन माऊली च्या पालखी ने आळणी कडे प्रस्थान केले.या वेळी अँड. नंदकुमार मैराण,सुनिल शेरखाने, सुरेश गवळी , सूनिल पंगुडवाले,किरण शेटे, दिगंबर तोडकरी, समाधान भोरे, अनिल बहिरे,, संदीप पाळणे महेश उपासे व वीरशैव लिंगायत भजनी मंडळासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव
0 Comments