अवैध जनावरांची वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भुम उपविभागीय हद्दीत दि,२० रोजी अवैध धंदे विरुध्द कारवाई कामी पेट्रोलिंग करीत असताना वालवढ, ता. भुम येथे आले असताना श्री. वासुदेव मोरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पांढऱ्या रंगाच्या पिकअप बोलेरो वाहन क्र एमएच11 सीएच 4728 व इतर दोप पिकअप मध्ये गाय,बैल, वासरे असे प्राणी कत्तल करण्याकरीता वारदवाडी ते भुम मार्ग धाराशिव येथे घेवून जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिकगुन्हे शाखेचे पथकवारदवाउी फाटा ते भुम कडे जाणारे रोडवरील एम आय उीसी भुम लगत असलेल्यारोडवर वाहनाना पकडण्याकरीता दबा धरुन बसले असता अंदाजे 04.00 वा. चे सुमारास रोउवरुन पांढऱ्या रंगाच्या तीन पिकअप एकामागोमाग येत असताना दिसल्या त्यांना बातमी प्रमाणे सदरच्यावाहनांचा संशय आल्याने त्यांनी त्यास हात दाखवून थांबिवले असता पांढऱ्या रंगाच्या पिकअप बुलेरो वाहन क्र. एमएच 11 सीएच 4728 ही थांबले व त्यांचे मागील दोन पिकअप युटर्न घेवून रोडने परत वारदवाउीच्या दिशेने वेगाने निघून गेल्या. ताब्यात असलेल्या पिकअप चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव समाधान सुदाम कांबळे, वय 22 वर्षे, रा. पापणस, ता. माढा जि. सोलापूर असे असल्याचे सागिंतले वरुन पोलीस पथकाने वाहनाच्या पाठीमागेजावून पाहणी केली असता सदर पिकअप वाहनामध्ये अंदाजे 64,000₹ किंमतीचे 6 बैल, गाय दाटी वाटीने बांधून त्यांना पुरेसी हालचाल करता येणार नाही अशा रितीने छळ करुन त्यांची वाहतुक करीत असताना मिळून आल्याने त्याचे ताब्यातुन अंदाजे 64,000₹ किंमतीचे 6 बैल, गाय जनावरासह 5,00,000 ₹ किंमतीचे बुलेरो पिकअप वाहन असा एकुण 5,64,000₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे समाधान सुदाम कांबळे, वय 22 वर्षे, रा. पापणस, ता. माढा जि. सोलापूर यांचे विरुध्द भुम पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. इतर दोन वाहनांचा पोलीस शोध घेत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक- श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शैलेश पवार, पोलीस उप निरीक्षक श्री. संदीप ओहोळ,पोलीस अंमलदार- राहुल तेलप, नेताजी गेजगे, प्रशांत आडगळे, राहुल कोळी, हवेल जाधवर, अक्षय मनगिरे, गणेश सुर्यवंशी, किरण शहाणे, रंजित बागल, भगिरथ पंतगे, प्रशांत किंवडे, पोकॉ/450 गणेश पटारे, राजेश वादे यांचे पथकांनी केली आहे
0 Comments