Hot Posts

6/recent/ticker-posts

मयत पुरुषाची ओळख पटविण्याचे तुळजापुर पोलिस ठाण्याचे आवाहन

मयत पुरुषाची ओळख पटविण्याचे तुळजापुर पोलिस ठाण्याचे आवाहन

 धाराशिव,दि २०: तुळजापूर येथील मुक्तांगण शाळेसमोरील धाराशिव रोडलगत  11 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 4.15 वाजता अनोळखी पुरुष जातीचा इसम मयत अवस्थेत आढळून आला आहे.ज्याचे वय अंदाजे 46 वर्ष आहे. त्या व्यक्तीस नगरपालिका सफाई कामगारांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या इसमाची वैद्यकीय तपासणी करुन त्यास मृत घोषित केले आहे. मयत अनोळखी पुरुषाचा तपास तुळजापूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्री.घाडगे करीत आहेत.

मयत पुरुषाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. मजबूत बांधा, अंगात पांढरट मळकट पँट, चॉकलेटी रंगाची अंडरवेअर, रंग सावळा, डोळे लहान बंद, उंची 165 सेमी, नाक सरळ, चेहरा गोल, केस अर्धवट पांढरे, दाढी वाढलेली अर्धवट पांढरी, उजव्या गुडघ्यावर खालील बाजूस तीळ आहे.

वरीलप्रकारचे वर्णन असलेल्या मयत अनोळखी व्यक्तीबद्दल कोणास माहिती असल्यास  8975809410 आणि 9822688240 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.घाडगे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments