Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यातील पशुपालकांनी, योजनांच्या लाभासाठी अर्ज करावा पशुसंवर्धन विभागाचे आव्हान|Cattle breeders of Dharashiv district should apply for the benefits of the schemes, the challenge of Animal Husbandry Department

धाराशिव जिल्ह्यातील पशुपालकांनी, योजनांच्या लाभासाठी अर्ज करावा पशुसंवर्धन विभागाचे आव्हान 

 धाराशिव : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत सन 2021- 22 पासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे . यामध्ये शासनाच्या एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी सन 2021- 22 पासून पुढील पाच वर्षापर्यंत म्हणजेच सन 2025- 26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशीचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, शंभर मांसल कुकुट पक्षी, संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे,१०० कुकुट पिलांचे वाटप, व २५+३ तलंगा गट वाटप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया 2023- 24 या वर्षात राबवली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे . बालाघाट न्यूज टाइम्स तुळजापूर धाराशिव

Post a Comment

0 Comments