नाविन्यपूर्ण योजनांसाठी अर्ज करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन,१५ डिसेंबर अंतिम मुदत-
धाराशिव : ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्ज अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याच अनुषंगाने राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने ॲप वर दिनांक 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरुवात करण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई, म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे,1000 कुकुट पिलांचे वाटप व 25 +3 तलंगागट वाटप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2023 24 या वर्षात राबवली जाणार आहे. पशुपालकांना डेरी पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्यांची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. पशुपालक शेतकरी बांधव सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धत याबाबतचा संपूर्ण तपशील पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिला आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच 15 डिसेंबर पर्यंत स्वीकारले जातील तसेच योजनेबाबत अधिक माहितीसाठी 1962किंवा 18 00 233 0148 या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्साले अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा असे आव्हान जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.
0 Comments