परंडा शहरातील अवैध कत्तल खान्यावर छापा, गुन्हा दाखल
धाराशिव: मा. पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद श्री. अतुल कुलकर्णी यांनी धाराशिव जिल्ह्यात गोवंशीय जनावराची अवैध कत्तल व वाहतुक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. दि.020.12.2023 रोजी परंडा शहरातील शिकलकर गल्ली येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस उप निरीक्षक श्री. ओहोळ, सपोफौ/504 काझी, पोलीस हावलदार/ 327 जानराव, 530 निंबाळकर, पोलीस नाईक/1479 जाधवर, पोलीस अमंलदार- 1029/ कोळी, व पोलीस मुख्यालय येथील जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस अंमलदार यांच्या पथकाने दि. 20 12.2023 रोजी 09.30 वा. सु. परंडा शहर येथे रवाना होउन अवैध कत्तल खान्यावर छापा टाकला.
सदर छापा कारवाई मध्ये सदर ठिकाणी काही इसम मिळून आले असता त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) जाकीर हुसेन गुलाम गणी, वय 60 वर्षे, रा. शेख मोहल्ला इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे, 2) आशपाक सादीर वेपारी, वय 30 वर्षे, रा. कासार पट्टा इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे, असे मिळून आले त्यांचे कडे अवैध कत्तलखाना चालवणारा मालकाविषयी चौकशी केली असता सदरचा कत्तलखाना1) फाजील इस्माईल सौदागर, रा. परंडा, 2) ऐराब वाहिद सौदागर, 3)ओवेस वाहिद सौदागर दोघे रा. सिकलगर गल्ली परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांचा. याचा असुन तो विनापरवाना असल्याचे सागिंतले.
सदर छापा कारवाई दरम्यान पोलीस पथकाने नमुद कत्तलखान्यामध्ये मिळून आलेले अंदाजे 5000किलो वजनाचे गोवंशीय जनावरांचे मांस असे एकुण 10,00,000 ₹किंमतीचे, 9 गोवंशीय जातीचे जर्सी गाय, 1 बैल व 40 जर्सी गायीचे वासरे किं अंदाजे 2,70,000₹, आयशर कंपनीच्या टेम्पो एमएच 45- 1389 चार पिकअप 1) एमएच 45 टी 2150, 2) एमएच 11 ए.जी. 9470, 3) एमएच 08 ए.पी. 1420, 4) एमएच 11 टी 5998 या पिकअप व टेम्पोमध्ये देखील मांस वाहतुकीसाठी वापरलेले, लोखंडी सत्तुर, सुरी, लोखंउी टांगता वजन काटा, तसेच 29 पत्रयाचे डब्बे, पाण्याची मोटर असा एकुण 42,05,000 ₹ किंमतीचा माल नमुद आरोपीच्या ताब्यात मिळून आला तो जप्त करण्यात आला आहे.
सदर जप्त करण्यात आलेले गोवंशीय जनावरांच्या मांसाचे नमुने प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, परंडा डॉ. पल्ला यांच्या मार्फतीने मांसाचे नमूने काढले आहेत. तसेच जप्त मांस हा नाशवंत पदार्थ असल्याने तो नगरपरिषद परंडा यांच्या डंम्पींगच्या जागेत खड्ड्यात पुरुन नाश करण्यात आला आहे. व जीवंत 9 जर्सी गाय, एक बैल, 40 जर्सी गायची वासरे अशी जनावरे हे गो शाळेत देण्याची कार्यवाही केली आहे. या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक श्री. संदीप ओहोळ यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे गुरनं 279/2023 महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5(क), 9, 9(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक श्री. ओहोळ, सपोफौ/504 काझी, पोलीस हावलदार/ 327 जानराव, 530 निंबाळकर, पोलीस नाईक/1479 जाधवर, पोलीस अमंलदार- 1029/ कोळी, जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments