दिव्यांग विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्धाटन उत्साहात
धाराशिव,दि.२२: समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद यांच्या वतीने दिव्यांगांच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे तुळजाभवानी स्टेडियम येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता,पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका प्रांजल शिंदे,जि.प.चे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ,मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन इगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शाम गोडभरले यांनी हेलन केलर,लुई ब्रेल,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पुजन करुनदीप प्रज्वलन केले.यावेळी क्रीडा ध्वज फडकवून व रंगीबेरंगी फुले हवेत सोडून उद्धाटन करण्यात आले.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी खेळाचे महत्व सांगितले.खेळामुळे तन,मन शुध्द राहते.शरीर निरोगी राहते असेही त्यांनी सांगितले.श्री.गुप्ता यांनी दिव्यांग खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवदत्त गिरी यांनी केले.
दिव्यांग शाळेतील 26 शाळांनी सहभाग घेतला आहे.यामध्ये 1300 विद्यार्थी खेळाडू सहभागी आहे.एकूण 13 क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. यामध्ये मुकबधीर,मतीमंद,अस्थिव्यंग व अंध प्रवर्ग आहेत.यामधून प्रथम आलेल्या खेळाडूंना राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये संधी मिळणार आहे.दोन दिवस या स्पर्धा चालणार असून खेळाडूंना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे श्री.गिरी यांनी सांगितले.
कार्यक्रमांमध्ये दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी, प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मयुर काकडे,दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके,दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी तसेच दिव्यांग शाळेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.भानुदास कलवले, बालाजी शिंदे,सचिन सरवदे,रफिक कोतवाल,प्रताप भायगुडे,चंद्रकांत जाधव,शहाजी चव्हाण,जुनेद शेरीकर यांचे स्वागत व सत्कार देवदत्त गिरी व जि.प.चे सहाय्यक लेखाधिकारी सुधीर जाधवर यांनी केले.
तत्पूर्वी स्पर्धेची सुरुवात अस्थिव्यंग प्रवर्गातून 50 मीटर धावण्याच्या स्पर्धेने करण्यात आली. या स्पर्धेस उपस्थित पाहुण्यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली. कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,समाज कल्याण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बालाजी नादरगे यांनी केले.
0 Comments