तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे रिन्यू पावर कंपनी मार्फत गरजू नागरिकांना मोफत ब्लॅंकेटचे वाटप
तुळजापुर : तालुक्यातील चिवरी येथे रिन्यू पावर कंपनी मार्फत येथील वयोवृद्ध, गरजू नागरिकांना २०० ब्लॅंकेटचे मोफत वाटप दि,२३ डिसेंबर रोजी नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच शिवकन्या प्रशांत बिराजदार , ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील,ग्रा.स. सचिन शिंदे, माजी सैनिक विठ्ठल होगाडे,प्रशांत बिराजदार, रिन्यू पावर कंपनीचे एडमिन भारत सावंत, वरिष्ठ अभियंता अमितसिंग, शेवाळे गणेश वरिष्ठ अभियंता, बाळासाहेब घोडके सक्रिय संरक्षण क्षेत्र अधिकारी, माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी पोपटराव पाटील,प्रभाकर बिराजदार, हर्षद बिराजदार,राजेंद्र बनसोडे, आशा कार्यकर्त्या अर्चना राजमाने,राजश्री कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments