Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरातील पोलीस उप निरीक्षक अडकला अँटी करप्शनच्या जाळयात|Police sub-inspector in Solapur got caught in the net of anti-corruption

सोलापूरातील पोलीस उप निरीक्षक अडकला अँटी करप्शनच्या जाळयात

----------------------------------------

एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संबंधित घडलेल्या या लाच प्रकरणात फौजदार विक्रम प्रतापसिंग राजपूत रंगेहाथ सापडले .


--------------------------------------- .

सोलापूर- दाखल झालेल्या गुन्ह्यात अनुकूल तपास करण्यासाठी आणि यापूर्वी दाखल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी स्वतःसाठी आणि तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या नावाने दोन लाख रूपयांची लाच मागितली आणि तडजोडीत एक लाख रूपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शविल्याप्रकरणी सोलापुरातील एका फौजदाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उप निरीक्षक विक्रम प्रतापसिंग रजपुत, एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर यांच्या विरोधात तक्रारदार यांचेकडून १,००,००० /- रुपये लाचेची मागणी करुन, ती स्विकारण्यास संमती दिल्या वरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.

यातील तक्रारदार यांचे मित्र यांचेवर एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे दाखल असलेल्या गुन्हयाचा तपास हा पीएसआय विक्रम रजपुत करत असून, सदर गुन्हयामध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांचे मित्र यांचेवर यापूर्वीही अॅट्रोसिटी व इतर गुन्हे दाखल असून त्यांचेवर सीआरपीसी कलम १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी पीएसआय विक्रम रजपुत यांनी स्वताःसाठी व पोनि राजन माने यांचे नावे म्हणून २,००,००० /- रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडी अंती १,००,००० /- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयार दर्शवील्याचे पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाल्याने, पीएसआय विक्रम रजपुत यांनी अयोग्यरित्या बेकायदेशीर परितोषण स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने त्यांना ताब्यात घेवुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे सुरु आहे.

ही कारवाई अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लाप्रवि, पुणे, डॉ. शीतल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे, पोलीस अंमलदार- पोह/ शिरीषकुमार सोनवणे, पोना/ श्रीराम घुगे, पोना/अतुल घाडगे, पोना/ संतोष नरोटे, पोना/ स्वामीराव जाधव, पोशि/ गजानन किणगी, चापोशि/ शाम सुरवसे सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्यूरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments