Hot Posts

6/recent/ticker-posts

बहिणीला नेहमी मारहाण करतो हा राग मनात धरून मेव्हण्याने काढला भावजीचा काटा, मेव्हण्यासह चौघाविरुद्ध तुळजापुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

बहिणीला नेहमी मारहाण करतो हा राग मनात धरून मेव्हण्याने काढला भावजीचा काटा, मेव्हण्यासह चौघाविरुद्ध तुळजापुर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल



धाराशिव : चारित्र्याच्या संशयावरून बहिणीला नेहमी त्रास देत असल्याचा राग मनात धरून सख्या मेव्हण्याने मित्राच्या मदतीने मारहाण करून गाडीने धडक देऊन ठार केल्याची घटना ईटकळ तुळजापुर रस्त्यावर कसई  पाटील जवळ बुधवार दिनांक 17 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली, याप्रकरणी मृताच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात संबंधित मयताची पत्नी मेव्हणा व अन्य तीन अनोखे इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील  इटकळ येथील बसवेश्वर भीमाशंकर जळकोटे (मयत) हे सोलापूर येथील मार्केट यार्ड मध्ये कामास होते तसेच त्यांची पत्नी अश्विनी जळकोटे या मंगरूळ येथील कनकेश्वर साखर कारखाना परिसरात खाजगी कॅन्टीन मध्ये मजुरीचे काम करत आहेत. नेहमी पत्नी अश्विनी यांना पती बसवेश्वर जळकोटे यांच्याकडून मारहाण केली जात होती . याचाच राग मनात धरून मेव्हणा सागर सुभाष धबडे   यांनी आपल्या तिघा मित्राच्या साथीने भाऊजी बसवेश्वर जळकोटे तुळजापूर ईटकळ रोडवरील कसाई पाटील  येथे बेदम मारहाण केली, मारहाण इतकी गंभीर केली की अक्षरशः मारहाणीत बसवेश्वर जळकोटे रक्ताने माखली होते अशा परिस्थितीत जखमी अवस्थेत असलेले बसवेश्वर जळकोटे रस्त्याच्या कडेला उभे असतानाच, सागर धबडे यांनी त्यांच्याकडील असलेल्या चार चाकी वाहनाने त्यांना जबर धडक देऊन अंगावर घातले व सागर व त्याचे साथीदार तिथून प्रसार झाले .यात ते आणखीन गंभीर जखमी झाले. या गंभीर अवस्थेत बसवेश्वर जळकोटे यांना खाजगी वाहनाच्या माध्यमातून तातडीने मंगरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल के असता  प्रचंड रक्तस्त्राव सुरू असल्याने तेथील डॉक्टरांनी वाहनातच तपासणी करून तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात रेफर केली. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून बसवेश्वर यांना मृत घोषित केले. दरम्यान याप्रकरणी मयताची बहीण  वनिता सिद्धेश्वर ममाने राहणार कसई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयताची पत्नी अश्विनी जळकोटे, मेव्हणा सागर धबडे व त्याचे इतर दोन साथीदार यांच्याविरुद्ध    दि.18.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 302, 337, 338, 323, 504, 506, 34  भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

Post a Comment

0 Comments