धाराशिव: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मा.ना.संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आढावा बैठक संपन्न
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे ( दि. 07) महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा धाराशिव चे संपर्क मंत्री संजय बनसोडे साहेब प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार व जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना अजितदादा पवार साहेब हे दिनांक 13 जानेवारी रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर कार्यकर्ता मेळावा साठी उपस्थित राहणार असून या मेळाव्याच्या नियोजनार्थ आज राष्ट्रवादी भवन येथे ही बैठक पार पडली तसेच लोकसभा 2024 च्या निवडणुकीत संदर्भात विविध विषयावरती चर्चा घडून आली त्याचप्रमाणे जिल्ह्यातील बुथ कमिटी आढावा देखील घेण्यात आला.
या बैठकीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांनी उपस्थित पदाधिकारी यांना अजित दादा यांच्या होणाऱ्या दौऱ्याविषयी सूचना व लोकसभा 2024 तसेच बूथ कमिटी विषयी मार्गदर्शन केले.
जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना म्हणाले की अजित दादाचा दौरा हा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता यांनी प्रयत्न केला पाहिजे व या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या भाषणात केले. त्याचप्रमाणे प्रमुख नेते व मान्यवर यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले
यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा धाराशिव संपर्क मंत्री आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात म्हणाले की, मा.ना.अजितदादा आपल्या जिल्हा दौऱ्यावर येत असून हा दौरा यशस्वी झाला पाहिजे व आपल्या जिल्ह्याचे नाव आदरणीय दादांच्या कायमस्वरूपी लक्षात राहावे असे आपण सर्व कार्यकर्ते मिळून करू व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार विजयी करू असे त्यांनी आपल्या मनोगत आतून व्यक्त केली.तसेच तालुकानिहाय बूथ कमिटी आढावा व अजित दादांच्या दौऱ्याविशयी सूचना केल्या.यावेळी उपस्थित प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे,भास्कर खोसे
नंदकुमार गवारे,गोकुळ शिंदे,प्रवीण यादव, मराठवाडा पदवीधर विभाग कार्याध्यक्ष नितीन बागल, शफी भाई शेख,भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप,धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मलंग शेख,धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, तुळजापूर शहराध्यक्ष महेश चोपदार,युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे,शिवाजीराव लकडे,युवक जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप,धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे,वाशी तालुकाध्यक्ष ॲड.सूर्यकांत सांडसे,भूम तालुका अध्यक्ष ॲड. रामराजे साळुंखे,परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षिरसागर,ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी,सेवा दल विभाग जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,कामगार जिल्हाध्यक्ष जावेद शेख,सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष सुहास मेटे,उदयचंद्र खंडागळे,माजी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण,किसान सभा सेल जिल्हाध्यक्ष प्रकाश बावणे,युवक जिल्हा सरचिटणीस शमसोद्दीन जमादार,युवक प्रदेश सरचिटणीस शंतनु खंदारे,धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे,कळंब युवक तालुकाध्यक्ष अमर मडके,वाशी युवक तालुकाध्यक्ष अविनाश काटवटे,तुळजापूर युवक तालुकाध्यक्ष नितीन आबा रोचकरी,तुळजापूर तालुका युवक कार्याध्यक्ष समाधान ढोले,तुळजापूर युवक शहराध्यक्ष शशी नवले,धाराशिव युवक शहर कार्याध्यक्ष संदीप बनसोडे,जगदीश पाटील, महेश नलावडे, अप्सरा पठाण, धाराशिव तालुका उपाध्यक्ष ऋषिकेत शिंदे, नितीन चव्हाण, विराट पाटील,तुळजापूर तालुका उपाध्यक्ष गोविंद देवकर,जिल्हा सचिव फिरोज पठाण,सा.न्याय.प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत शिंदे, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष संतोष भाकरे, सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे, परंडा शहराध्यक्ष जावेद पठाण,सामाजिक न्याय तुळजापूर अध्यक्ष विनोद जाधव,सा.न्याय.धाराशिव शहराध्यक्ष विक्रम कांबळे, सामाजिक न्याय धाराशिव महिला शहराध्यक्ष भाग्यश्री माळाळे, सा.न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव, धाराशिव तालुका सचिव सुजित बारकुल,जानरावसमियोद्दीन मशायक,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, आळणी गावचे सरपंच प्रमोद वीर,केशेगाव जि प गटप्रमुख लिंबराज लोखंडे,धाराशिव विद्यार्थी तालुका गणेश गुरव,अरफात काजी,ज्योतीराम जाधव,रविंद्र नलावडे,अभय माने,विनोद अवतरे उपस्थित होते.
0 Comments