महाराष्ट्रातील या नागरिकांना मिळणार पाच गुंठे जमीन अन् घरकुल
मुंबई: महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. ज्या लोकांना राहण्यासाठी पक्के घर नाही अशा लोकांसाठी राज्य शासनाकडून पक्के घर देखील उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी विविध घरकुल योजना राबवल्या जातात, राज्यातील विविध समाजातील लोकांसाठी विविध घरकुल योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शबरी आवास योजना अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास योजना याशिवाय राज्य शासनाने नुकतीच ओबीसी समाजातील नागरिकांसाठी मोदी आवास योजना राबविण्याची जाहीर केली आहे. एवढेच नाही तर राज्यातील भटक्या विमुक्त प्रवर्गातील नागरिकांना घरकुल उपलब्ध व्हावे यासाठी देखील एक विशेष योजना राबवली जात आहे. या भटक्या विमुक्त प्रवर्गातील जातींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना राबवली जात आहे, या अंतर्गत भटक्या विमुक्त समाजातील ज्या नागरिकांना हक्काचे घर नाही त्यांना हक्काचे घर उपलब्ध होत आहे. दरम्यान आज आपण या योजनेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील भटक्या जमातीचा विकास करणे, राज्यातील भटक्या जमातीचे राहणीमान उंचावणे, भटक्या जमातींना विकासाच्या प्रवाहात आणणे, भटक्या जमाती जीवनात स्थिरता प्राप्त करणे, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे हे उद्देश राज्य शासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे.
काय आहेत योजनेची अटी पहा
एक लाख रुपये पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना याचा लाभ मिळतो, स्वतःचे घर नसलेल्या नागरिकांना याचा लाभ मिळतो. कच्च्या घरात तसेच झोपडी मध्ये राहणाऱ्या नागरिकांना या योजनेअंतर्गत घरकुल मिळते. भूमिहीन कुटुंबाला याचा लाभ मिळतो कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती यासाठी पात्र राहते, सहा महिन्यापेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना याचा लाभ मिळतो, ही योजना फक्त महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सुरू आहे.
योजनेच्या लाभासाठी अर्ज कुठे करणार?
ही योजना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवली जात आहे यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागात अर्ज करावा लागतो. जर तुम्हीही या योजनेसाठी पात्र झाला तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे अर्ज करू शकता.
कोणाला मिळतो लाभ ?
गावोगावी जाऊन भटकंती करून आपला उदरनिर्वाह भागविणाऱ्या लोकांसाठी योजना सुरू करण्यात आली आहे या अशा भटक्या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. भटक्या विमुक्त प्रवर्गातील नागरिकांना या अंतर्गत घरकुल उपलब्ध होत आहे.
या योजनेअंतर्गत मिळते पाच गुंठे जमीन
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच गुंठे जमीन उपलब्ध करून दिली जाते, संबंधित लाभार्थ्याला 269 चौरसफूटाचे घर देखील उपलब्ध करून दिले जात आहे
0 Comments