Hot Posts

6/recent/ticker-posts

तोरंबा येथील मातंग समाजाच्या मागासवर्गीय महिलेवर अत्याचार करून खून केलेल्या व्यक्तीवर तात्काळ कडक कार्यवाही करावी, या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन

तोरंबा येथील मातंग समाजाच्या  मागासवर्गीय महिलेवर अत्याचार करून खून केलेल्या व्यक्तीवर तात्काळ कडक कार्यवाही करावी, या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन


धाराशिव : तोरंबा ता. लोहारा जि. धाराशिव येथील मातंग समाजाच्या श्रीमती रूपाली दिगंबर दुणगे या मागासवर्गीय महिलेवर अत्याचार करून बलात्कार करून खून केलेल्या व्यक्तीवर तात्काळ कडक कार्यवाही करावी, मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले,जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की,श्रीमती रूपाली डिगंबर दुणगे रा तोरंबा ता.लोहारा जि.धाराशिव येथील मागासवर्गीय मातंग समाजाच्या 25 वर्षच्या महिलेवर गावातील गजेंद्र गाविंद रणखांब, ललिता बिभिषण रणखांब व बिभिषण बालाजी रणखांब या जातीवादी लोकांनी श्रीमती रूपाली डिगंबर दुणगे या महिलांना शेतामध्ये कांदे कापण्यासाठी रविवार दिनांक 28/01/2024 रोजी बोलावून मानसिक व शारीरिक छळ करून बलात्कार करून अमानुषपणे खून केलेला आहे, तेव्हा संबंधित आरोपीविरूध्द मागासवर्गीय महिलेवर मानसिक व शारीरिक छळ करून खून केल्याप्रकरणी अट्रासिटी अॅक्टप्रमाणे व खून केल्याप्रकशी गुन्हा नोंद करून संबंधित आरोपी विरूध्द फास्ट कोर्टात केस दाखल करून तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी ही बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने मागणी केली आहे,या निवेदनावर सौ.कोमलताई साळुंखे ढोबळे प्रदेश अध्यक्ष,योगेश येडाळे जिल्हाध्यक्ष धाराशिव.ईश्वर क्षिरसागर प्रदेश सरचिटणीस,खंडू पवार जिल्हाध्यक्ष सोलापूर,दत्तात्रय पाटील प्रदेश संपर्क प्रमुख चंदू चव्हाण जिल्हा कार्याध्यक्ष सोलापूर,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments