धाराशिव: श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न
धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव व प्राचीन आयुर कर्मा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने दिनांक ९, १० व ११ फेब्रुवारी रोजी तीन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नाडी परिक्षण, प्रकृती परिक्षण, डायबेटीज, नेत्र चिकित्सा, ब्लड प्रेशर, बी. एम. आय व बॉडी फॅट, योगा & व्यायाम, आहार व सल्ला इत्यादींच्या आधारे संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबीरात कोरियन तंत्रज्ञानाच्या आधारे संपूर्ण बॉडी स्कॅनिंगच्या २८ व रक्त तपासणीच्या १७ अश्या एकूण ८९ प्रकारच्या तपासण्या ठेवण्यात आल्या होत्या. या शिबिराचा संस्थेतील, शाळेतील ६०० पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. यामध्ये २० हून अधिक जणांनी संपूर्ण बॉडी चेक अप केले. ही तपासणी डॉ. राजेंद्र कदम, डॉ. दत्तात्रय दाभाडे व त्यांचे सहकारी श्री. नितीन शिंदे, श्री. रितेश कदम, श्री. शिवम होनुंगरे इत्यादींनी पार पाडली. तसेच या शिबीराला प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील सर, प्राचार्य श्री. एस. एस. देशमुख सर उपप्राचार्य श्री. एस. के. घारगे सर आदींनी भेटी दिल्या. या शिबिरासाठी संस्थाध्यक्ष मा. श्री. सुधीर अण्णा पाटील यांचे सहकार्य लाभले.
0 Comments