येरमाळा महसूल मंडळचा लाचखोर मंडळाधिकारी ४ हजार लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात|
धाराशिव : देवस्थान जमिनीतील मुरूम रॉयल्टी न भरून घेता वाहतूक करण्यास परवानगी देण्यासाठी तसेच संबंधित तलाठी यांना या संदर्भात कारवाई करू नये असे सांगण्यासाठी चार हजाराची लाच घेताना येरमाळा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी देवानंद कांबळे हे गुरुवारी दिनांक 28 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले आहेत
याबाबत अधिक माहिती अशी की कळम तालुक्यातील चोराखळी येथे गट क्रमांक 639 / 1 मध्ये एका देवस्थान मालकीची शेतजमीन आहे तक्रारदारास या जमिनीतून 50 ब्रास मुरूम हवा होता यासाठी गौण खनिजाच्या स्वामित्व धनाची रक्कम न भरून घेता वाहतूक करण्याची परवानगी देण्यासाठी तसेच संबंधित सध्याच्या तलाठी यांना याबाबत कारवाई न करण्याबाबत सांगण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे येरमाळा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी देवानंद मरगु कांबळे यांनी लाचेची मागणी केली होती त्याची तक्रार यांनी धाराशिव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली लाचीची खातरजमा केल्यानंतर लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव धाराशिव पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विकास राठोड यांच्या पथकाने सापळा लावला त्यात धाराशिव शहरात आनंद नगर भागातील भाड्याने राहत असलेल्या घरात मंडळ अधिकारी देवानंद कांबळे हे तक्रारदार यांच्याकडून चार हजार रुपयाची लाज स्वीकारताना पथकाच्या गळाला लागले या कारवाईत पोलीस निरीक्षक विकास राठोड यांच्यासह अमलदार मधुकर जाधव विशाल डोके सहभागी होते या प्रकरणी धाराशिव आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
0 Comments