धाराशिव :श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाचे सीईटी परीक्षेत उल्लेखनीय यश
धाराशिव /प्रतिनिधी :दिनांक १६ जून रोजी एमएचटी - सीईटी (MHT-CET) परीक्षेचा निकाल जाहीर झाला, यामध्ये श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विदयालयातील फोटॉन व फेनॉमेनॉल बॅचमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. यामध्ये पीसीबी (PCB) ग्रुपमधून सांळुके ऋतुजा जयवंत (98.60) प्रथम, तांबोळी अमन जावेद (97.23) द्वितीय, देटे शिवराज बप्पासाहेब (97.15) तृतीय, पवार स्नेहल विजय (97.10) चतुर्थ तसेच पीसीएम (PCM) ग्रुपमधून घोलकर आदित्य संभाजी (98.74) प्रथम, देशमुख समृध्दी नरहरी (97.34) द्वितीय, करवर विश्वजीत पांडूरंग (96.76) तृतीय, शेरकर आदित्य राम (95.57) चतुर्थ आला. या विद्यार्थ्यांना शासकीय बी.एससी ॲग्री (B.Sc. Agri), बी. फार्मसी (B.Pharmacy), इंजीनियरिंग साठी प्रवेश मिळेल.
धाराशिव जिल्हयातील गुणवंत विदयार्थी १० वी नंतर लातूर, संभाजीनगर, हैद्राबाद, कोटा अशा ठिकाणी जेईई (JEE) व नीट (NEET) व सीईटी (CET) च्या तयारीसाठी जातात. यामुळे पालकांना आर्थिक नुकसान होते. पालकांचे आर्थिक नुकसान होऊ नये त्याच बरोबर विदयार्थ्यांना घरच्या वातावरणात तयारीसाठी जास्तीचा वेळ मिळावा, त्यांना योग्य अशा तज्ञ प्राध्यापकांकडून माफक फीसमध्ये मार्गदर्शन मिळावे हे उद्दिष्ट समोर ठेवून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने नीट (NEET), जेईई (JEE) व सीईटी (CET) परीक्षेसाठी श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विदयालय येथे फोटॉन (Photon Batch) व एमएचटी - सीईटी (MHT-CET) साठी फेनॉमेनॉल बॅच (Phenomenal Batches) सुरू करण्यात आल्या आहेत. या बॅचेसला शिकविण्यासाठी दिल्ली, कोटा येथील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक नेमण्यात आलेले आहेत. तसेच विदयार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकेची सोय उपलब्ध आहे.
फोटॉन व फेनॉमेनॉल बॅचची वैशिष्ट्ये पहायची झाली तर त्यामध्ये दिल्ली, कोटा येथील अनुभवी व तज्ञ प्राध्यापक, दर्जेदार मल्टीकलर प्रिंटेड स्टडी मटेरियल, सुसज्य ग्रंथालय व अभ्यासिका, बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी, चाप्टर वाईज ऑफलाइन परीक्षा घेणे व एसएमएस द्वारे पालकांना सराव परीक्षेचे गुण पाठवणे, डेली प्रैक्टिस प्रोग्राम च्या माध्यमातून पालकांना निकाल देणे, दररोज डाऊट सॉल्विंग सत्र घेणे, अभ्यासपूर्ण नियोजन व दर पंधरा दिवसाला परीक्षा, मुलभूत व क्लिष्ट घटकांचे प्रोजेक्टरद्वारे सुस्पष्टीकरण, सुपर ३० नाईट स्टडी रूम चालवणे, नीट (NEET), जेईई (JEE) व सीईटी (CET) बॅचमध्ये स्मार्ट डिजिटल बोर्ड द्वारे शिक्षण, संपूर्ण कॅम्पस व वर्ग खोल्या कॅमेरा अंतर्गत असणे, दत्तक योजनेद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तीक लक्ष, नीट (NEET), जेईई (JEE) व सीईटी (CET) परीक्षेनंतर पुढील प्रवेशासाठी मार्गदर्शन इत्यादी घटकांचा अंतर्भाव आहे.
यशस्वी विद्यार्थीचे संस्थाध्यक्ष श्री. सुधीर आण्णा पाटील सर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आदित्य पाटील सर, संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर, प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, पर्यवेक्षक श्री. एम.व्ही. शिंदे, फोटॉन बॅच प्रमुख श्री. ए.व्ही. भगत, फेनॉमेनॉल बॅच प्रमुख श्री. जे. एस. पाटील, पत्रकार परिषदेचे विविध पदाधिकारी, पत्रकार, संस्थेचे विविध पदाधिकारी तसेच सर्व प्राध्यापक, विषयप्रमुख, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
0 Comments