बार्शीनाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
धाराशिव : धाराशिव शहरातील बार्शीनाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे तुळजापूर तालुकाध्यक्ष तथा जिजामाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मधुकर शेळके यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव शहरातील बार्शीनाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तसेच श्रीपतराव भोसले हायस्कुल, शहर पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान या मार्गावरील रस्त्यांचीही तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर आम आदमी पार्टीचे तुळजापूर तालुकाध्यक्ष मधुकर शेळके, विकास घोडके, रोहीत शेंडगे यांची स्वाक्षरी आहे.
0 Comments