मोबाईल रिचार्ज दर वाढल्यामुळे ग्राहकाच्या खिशाला कात्री, खाजगी कंपनीवर अंकुश ठेवून शासनाने ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी
धाराशिव: सध्याच्या आधुनिक काळात घराघरात मोबाईलची संख्या वाढली असल्याने प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आले असून प्रत्येकासाठी संवाद साधण्यासाठी डिजिटल ऑनलाइन व्यवहार साठी मोबाईलचा वापर गरजेचा झाला आहे, आर्थिक मंदी असताना टेलिकॉम कंपनी रिचार्ज प्लॅन वाढवून नागरिकांच्या आर्थिक अडचणीत वाढ केली असून वाढीव रिचार्ज प्लॅन मुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत असल्याचे चित्र सध्या बाजारपेठेत पहावयास मिळत आहे.
गेल्या काही वर्षात मोबाईल ही माणसाला काळाची गरज बनली असून या गोष्टीचा लळा सामान्यातील सामान्य माणसापासून ते तरुण पिढी, शालेय विद्यार्थी शेतकरी नोकरदार वर्ग चाकरमारी वर्ग यांना लागला असून यामुळे हे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वांना मोबाईलचे व्यसन जडल्याचे म्हणायला काय वावगे ठरणार नाही दरम्यान सध्या स्मार्टफोनचे भाव गगनाला भिडले असली तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसत आहे त्यात इंटरनेट जोडल्यावर मोठ्या प्रमाणात करमणुकीचे चित्र पाहावेस मिळत असल्याने त्यावर युवक वर्ग बरोबरच सर्वसामान्य ग्राहक हे आकर्षित होत आहेत. सध्या माहिती आणि दळणवळणाच्या माध्यमातून खाजगी दूरसंचार मोबाईल कंपनीने नागरिकांना काही वर्षांपूर्वी मोफत सिम कार्ड वाटप करून इंटरनेट सह अनलिमिटेड कॉलिंग च्या अनेक सुविधा माफक दरात उपलब्ध करून देत आर्थिक भुरळ घातली त्यामुळे आपसूकच खेड्यातील व शहरातील ग्राहक हा मोठ्या प्रमाणावर मोबाईल कंपनीचे अमिषाला बळी पडत गेला व मोबाईलचा अधीन झाला हे जरी खरे असले तरी विविध खाजगी दूरसंचार कंपन्यांच्या वाढत्या ग्राहकसंख्येमुळे कंपन्यांची नेटवर्क सेवा ढासळली गेली. यामुळे झाले असे की स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी खाजगी कंपन्याने आपल्या कधी काळी महागाईत स्वस्तायीची कमाल म्हणणाऱ्या कंपन्यांनी आपल्या नेटवर्क सेवांची दर अव्वाच्या सव्वा करून ठेवले आणि आता मोबाईलच्या दुनियेत अधीन झालेल्या सर्वसामान्य जनतेला खाजगी दूरसंचार कंपनीकडून तोंड दाबून बुक्क्याचा मार सोसावा लागतो आहे. एकंदरीत चालू महिन्यापासून मोबाईल रिचार्ज दर 20 टक्क्यांनी वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून साधारण एका कुटुंबात कमीत कमी दोन ते तीन मोबाईल असल्याने महिन्यासाठी सुमारे एक हजार ते दीड हजार रुपये प्रत्येकी खर्च येत असून यामुळे आर्थिक मंदीत सर्व सामान्य कुटुंबातील लोकांचे मोठे हाल होत असून या खाजगी इतर मोबाईल कंपनीने केलेली दरवाढ रद्द करावी व बीएसएनएल कंपनी सक्षम करून पुन्हा भारत निगम संचार कंपनीस गतवैभव मिळवून द्यावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
0 Comments