धाराशिव :भागिरथी परिवाराच्या वतीने साहित्य क्षेत्रातील विविध महिलांचा सन्मान
धाराशिव: येथील भागिरथी परिवार यांच्या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने स्त्री शक्तीचा गौरव म्हणून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील यांनी 'अक्षरवेल' या साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेतील महिला साहित्यकारांचा सत्कार व सन्मान केला. सर्वप्रथम प्रमुख उपस्थित सर्व महिला साहित्यिक व सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची पूजा व आरती संपन्न झाली.
त्यानंतर यावेळी 'अक्षरवेल' या संस्थेच्या सर्व सर्वेसर्वा व मार्गदर्शक कमलाताई नलावडे मॅडम, अध्यक्षा सुलभा देशमुख मॅडम, उपाध्यक्षा विद्या देशमुख मॅडम, सचिव अपर्णा चौधरी मॅडम, सदस्या सोनाली दिक्षित मॅडम, साधना तावडे मॅडम, सुमित्रा आट्पळकर मॅडम, ज्योती कावरे मॅडम, जयश्री फुटाणे मॅडम, ढगे रेखा मॅडम, अर्चना गोरे मॅडम, सविता माळी मॅडम, योगिता सुरवसे मॅडम, गुंजाळ सुनिता मॅडम, अनिता पडवळ मॅडम, डॉ. अस्मिता बुरबुटे मॅडम आदींचा सौ. प्रेमाताई पाटील व सौ. मंजुळाताई पाटील यांच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी या कार्यक्रमासाठी संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील सर, प्राचार्य श्री. नन्नवरे सर, उपप्राचार्य श्री. घार्गे सर, पर्यवेक्षक श्री. शिंदे सर आणि कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
0 Comments