राज्य सरकारने सोयाबीनला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव दयावा - आपचे मधुकर शेळके यांची मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी
धाराशिव - राज्य सरकारने सोयाबीनला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये भाव द्यावे अशी मागणी आम आदमी पार्टी धाराशिव वतीने उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री .मधुकर शेळके यांनी मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की" राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दहा ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल भाव दयावा अशी मागणी निवेदना अधारे करण्यात आली. निवेदनामध्ये त्यांनी
सदय स्थितीत शेतकऱ्याची आर्थीक परिस्थिती खराब आहे उत्पादन खर्च वाढलेला आहे त्यात बेभरवशाचा हवामान कधी जास्त प्रमाणात पाउस तर कधी अत्यल्प पाऊस कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणीत पूर्ण कोलमडून गेले आहे अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते पिकाला योग्य भाव नाही उत्पादन खर्चात वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे .
तरी कृपया मा मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याची आर्थिक परिस्थिती सुधारणा होण्याकरिता कृपया सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ ते दहा हजार रुपये भाव द्यावा हि मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
बालाघाट न्युज टाइम्स प्रतिनिधीशी बोलताना सांगितले श्री.शेळके म्हणाले की, मागे केंद्र सरकारने सोयाबीन आयात केल्यामुळे राज्यातील सोयाबीन ला कमी भाव मिळत आहे शेतकरी अडचणीत आहे तरी वरिल मागणीचा योग्य विचार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली .
0 Comments