घटस्थापना म्हणजे कृषी संस्कृतीचा शास्त्रीय प्रयोग
=======================
अश्विन शुक्ल महिन्यात शारदिय नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो,त्यामध्ये घरोघरी घट घातले जातात..हे घट कृषी संस्कृतीची प्रयोगशाळाच आहे...घटस्थापना हा संस्कार नाही तर ती विज्ञानाचा एक कृतीशील प्रयोग आहे.अश्विन महिन्यात हस्त नक्षत्र असते..उन्हाळा सारख कडक उन्ह तर कधी मुसळधार पाऊस बरसत असतो...परतीच्या पाऊसाची सुरुवात झालेली असते.नदी,नाले,विहिरी,तलाव तुडुंब भरुन वाहत असतात,खरिपाची काढणी झालेली असते..शेतशिवार रब्बीच्या पीकासाठी ,पेरणीसाठी तयार झालेली असतात.तेंव्हा घटस्थापना हा शेतीतील रब्बी पिकांची भविष्यातील उत्त्पनाचा अंदाज घेण्यासाठी आपल्या पुर्वजांनी केलेला शास्रीय प्रयोग आहे.
खरिपांची पीके काढल्यानंतर मातीचा पोत,बाज,सकसता,जमिनीची सततच्या पावसाने झालेली धुप यामुळे ही माती वावरी ,काळी मृदा शेतातील घरी टोपल्यात आणुन ती घटाला घातली जाते.त्यानंतर त्यावर पेरण्यासाठी ज्वारी,गहु,करडई,हरभरा,जवस,तीळ,सातु,अंबाडी रब्बीची पिके धान्य टाकल जात...त्यावर शेतातील विहिरच पाणी आणुन नऊ दिवस घातले जाते.
तिसर्या ते चौथ्या दिवशी ते धान्य घटाचे उगवले जाते..हे सारे प्रायोगिक तत्वावर केलेले असते..याला शास्त्रीय आधार आहे.विहिरेचे पाणी रब्बीसाठी योग्य आहे का?याचा अंदाज पण घेतला जातो..शेतातील माती घटाला घालुन माती परिक्षण केले जाते...ज्वारी, गहु,करडई,तीळ,जवस,सातु इ.बी टाकल्यामुळे शेतात कोणते पीक घ्यायचे ,रब्बीची पीक पडताळणी घटस्थापनेतुन केली जाते.हा शास्रीय प्रयोग आहे.
आपण फार मोठ्या कृषी संस्कृतीचे पाईक आहोत..कृषीसंस्कृतीला अध्यात्माची जोड देत आपले सण,उत्सव पुर्वंजानी विज्ञानावर आधारित सुरु केले..आपल्या संस्कृतीला विज्ञानाचा आधार आहे..हा काळ संक्रमणाचा ही आहे..प्रचंड पावसानंतर कडक्याच्या थंडी कडे आपण प्रवास करत असतो..हा ऋतुबद्दल करण्यासाठी प्रकृती आरोग्य तयार करण्यासाठी घटस्थापने पासुन उपवास ही संकल्पना आणली..एकुणच माती परिक्षण,बीयांणाची निवड,विहिर च्या पाण्याचा अंदाज आणि पाण्याची क्षारता तपासणे,नवरात्रीत नऊ दिवस घटाची उगवण क्षमता तसेच उगवलेले अंकुर मोड दसर्याला घेऊन पेरणीला सुरुवात करणारा आमचा शेतकरी पुर्वज फार मोठ्या विज्ञानाच्या कृषी संस्कृतीचा पाईक आहे..त्याला शास्त्रीय आधार आहे..आमचा शेतकरी हा प्रथम शास्त्रज्ञच आहे..तो प्रयोगशील आहे..माती परिक्षण,बियाणांची निवड,पाण्याची क्षारता हे तपासण्यासाठी घटस्थापना हा दहा दिवसाचा सण उत्सव म्हणुन त्याने स्विकारला..
भारतीय लोक ,मराठी माणुस अंधश्रध्दाळु नाही तर तो डोळस आहे..त्याची श्रध्दा विज्ञानाच्या कसोटीवर सिध्द करत तो सण उत्सव साजरे करत असतो.वैज्ञानिक दृष्टीकोण ठेवत चिकित्सा पध्दतीने सणाची चिरफाड न करता श्रध्दापुर्वक संस्कृती जोपासणारा मराठी बांधव आणि भारतीय विज्ञाननिष्ठ कृषीसंस्कृतीचा पाईक आहे..
आम्हाला गर्व असायला हवा..की आम्ही डोळस ,फार मोठ्या संस्कृतीचे वारसदार आहोत.आम्ही विज्ञानवादी आहोत..पण आमच्या संस्कृतीला नाक डोळे मुरणार्या वृत्तीने थोडी चिकित्सक वृत्तीने अभ्यासु वत्ती जोपासली तर आमच्या संस्कृतीची खरी वैज्ञानिक प्रयोगशिलता दिसुन येईल...
घटस्थापना हा नवनिर्मिताचा ,नव उत्सवांचा,नविन आशा ,उमेद देणारा सण आहे..आमच्या प्रगतीचा अंदाज बांधणारा ,आमचे वार्षिक अंदाजपत्र ठरवणारा,आमचे उत्त्पानाची करमर्यादा ठरवणारा सण आहे..घटस्थापणा आमच्यासाठी केवळ सण नाही तर विकसित संस्कृतीचा तो प्रयोगशील शास्त्रीय आधार आहे.
अशा या मंगलकारी घटस्थापनाच्या सर्वांना नवीन आशा नविन उमेद घेउन सर्वांना मनस्वी शुभेच्छा!या उत्सवाने सर्वांना आपल्या प्रगतीची विकासाची द्वारे खुली होवोत ही शुभेच्छा!
वर्धिष्णु भव!.....
===================================
*श्री.पंकज रा.कासार काटकर*
*मु.पो.काटी.ता.तुळजापुर*
*जि.धाराशिव*
*मो.नं.-९७६४५६१८८१*
0 Comments