धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. मात्र बुधवारी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जीप चालक ते आमदार असा त्यांचा जीवनप्रवास होता.ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती.आज (गुरुवार) 1 वाजता परंडा (भोत्रा) रोडच्या शेतामध्ये त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.
सामान्य शिवसैनिक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. तसेच त्यांनी सुरुवातीच्या काळात ड्रायव्हर म्हणून काम करणारे पाटील पुढे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून राजकारणात उतरले आणि सन 1995 आणि 1999 अशा सलग दोन वेळेस ते भूम परंडा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले होते.
एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखले जायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता.धाराशिव जिल्ह्यात ज्ञानेश्वर पाटील यांनी आमदार असतानाही आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांची कामे केली आहेत. त्यामुळे या परिसरात पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे.ते मागील काही दिवसांपासून आजारी असूनही पाटील यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी केली होती. त्यांच्या या अकाली निधनामुळे शिवसेना ठाकरे गटाचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला आहे त्यांचा निर्णय भूम परंडा मतदारसंघात शोककळा पसरली आहे.
जीप चालक ते आमदार
ज्ञानेश्वर तात्या पाटील यांनी कार्यकर्त्यांचं मोठं जाळं धाराशिव जिल्ह्यामध्ये निर्माण केलं होतं. अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना त्यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपवर चालक म्हणून काम करण्यास सुरुवाती केली होती. दरम्यानच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
0 Comments