Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात इच्छुक या पक्षाच्या उमेदवारांच्या मनात धाकधुक वाढली विधानसभेचे तिकीट मिळणार तरी कोणाला ? उत्कंठा शिगेला


तुळजापूर/राजगुरु साखरे : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. परंतु महायुतीने आतापर्यंत जिल्ह्यात  तुळजापूर उमरगा -लोहारा ,भूम -परंडा विधानसभेचे उमेदवार निश्चित केले आहेत. अजून एक मतदारसंघातील उमेदवार बाकी आहेत. तर महाविकास आघाडीकडून तुळजापूर विधानसभा मतदारसंघात अद्याप तरी एकाचीही उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे मतदारसंघात इच्छुकांची गर्दी असल्याने कोणाला तिकीट मिळणार ? याबाबत इच्छुकांच्या मनात धाकधूक तर कार्यकर्त्यांची उत्कंठा शीगेला पोहचली आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार जाहीर होताच, कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे मतदान होण्यापूर्वीच कार्यकर्ते विजयाचे दावे प्रति दावे करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे .तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून इच्छुक उमेदवारांची  आमदारकीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी तील   पक्षश्रेष्ठींना आता उमेदवार निवडताना कसरत करावी लागत आहे. परंतु कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो. याची चाचपणी वरिष्ठ नेते करताना दिसत आहेत. प्रत्येक इच्छुक उमेदवार हा आपण कसे चांगले हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पण पक्ष कोणाला उमेदवारी देणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments