उन्हापासून कलिंगड पिकाचे संरक्षण कसे करायचे: सेंद्रिय शेती अभ्यासक डॉक्टर बाळा मावसकर
वर्धा : वाढत्या उष्मा तापमानामुळे कलिंगड टरबूज या पिकावर परिणाम होऊ लागला आहे उन्हापासून कलिंगड पिकांचे संरक्षण कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे हे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याला घरगुती उपाय करणे आवश्यक झाले आहे.. अशी माहिती सेंद्रिय शेती अभ्यासक डॉक्टर बाळा मावसकर यांनी दिली.
कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीत जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे वेल्डवर्गीय पीक आहे त्याला उन्हाळ्यात भरपूर मागणी असते आरोग्यवर्धक व्याधीशामक स्वादिष्ट असून जाम जेली सॉस निर्मितीसाठी उपयुक्त आहे सुकवलेल्या बिया आयुर्वेदिक दृष्ट्या गुणकारी आणि पौष्टिक असतात त्यामुळे शेतकरी आता उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे बाराही महिने हे पीक घेऊ लागलेत परंतु सध्या उन्हाचा पारा चढायला सुरुवात झाली आहे उन्हामुळे या फळ पिकावर परिणाम होत आहेत.
भाजीपाला पिकांची वाढ खुंटताना दिसते उसाची वाढ उन्हाचा पारा वाढल्याने खुंटत असल्याची शेतकरी सांगतात त्यामुळे वर्षभर पावसाळा हिवाळ्यामध्ये संकटांना तोंड देत देत शेतकऱ्याला उन्हाळ्यातही आर्थिक होरफळ सहन करावी लागत आहे.अशातच टरबूज सारख्या फळांची मागणी वाढायला सुरुवात झाली असताना उन्हाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे त्यासाठी उन्हापासून फळ पिकांचे संरक्षण कसे करावे हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्यात टरबूज फळ पिकांची मागणी वाढत आहे त्यासाठी फळांचे संरक्षण करून फळाची गुणवत्ता राखणे अत्यंत महत्त्वाची आहे उन्हामुळे फळावर पांढरे पिवळे डाग पडतात त्याला सन बर्निंग म्हणतात डाग पडण्याचे कारण म्हणजे फळ पूर्णपणे झाकला जात नाही ते फळ झाकले ते जावे याकरिता वेलींची शाखीय वाढ चांगली होणे गरजेचे आहे. सुरुवातीपासूनच नत्र पालाश आणि स्फुरद चा योग्य वापर केला पाहिजे. मातीचे पोषण व्यवस्थित झाले पाहिजे डाग पडलेल्या मालाची मागणी कमी होत होते पाहिजे तसा दर मिळत नाही टरबुजाची उन्हापासून संरक्षण करण्यासाठी फळाच्या खालच्या पाचट ठेवावे जेणेकरून जमिनीतून निघणारी वाफ थेट फळाला लागणारी नाही दुसरी गोष्ट वेलीला लागलेली आणि उघडी झालेली फळे पानांमध्ये झाकून ठेवावी तसेच शक्य असल्यास फळावर पेपर बॅग लावावी पेपर बॅग लावत असताना वर्तमान पेपरचा वापर करावा.कोनासारखी आकार तयार करून फळावर लावता येते पेपरचा मातीशी संपर्क येणार नाही अशा पद्धतीने लावावा फळ फुगवणुकीच्या काळात किमान एक ते दोन वेळा तरी फिरवून ठेवावे पिकाला पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे कारण दिवसभर उन्हाळ्यात पाणी दिल्यास बाष्पीभवनाने वाफ तयार होऊन फळावर उष्णतेचा परिणाम होते तर अशा पद्धतीने आपण उन्हाळ्यात कलिंगड सारख्या चांगल्या मागणी असलेल्या फळ पिकाची उन्हापासून संरक्षण करू शकतो अशी माहिती सेंद्रिय शेती अभ्यासक डॉक्टर बाळा मावसकर यांनी दिली.
0 Comments