उन्हाळ्यात कुलर वापरताना विद्युत सुरक्षितता काळजी घ्या -महावितरणचे आवाहान
जालना: तापमान वाढल्याने कुलरचा वापर शहरासह ग्रामीण भागात कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे मात्र खबरदारी न घेतल्याने अपघाताची शक्यता असते त्यासाठी नागरिकांनी कुलर वापरताना विद्युत सुरक्षेची खबरदारी घ्यावी अशी आव्हान महावितरण केले आहे.
कुलर साठी नेहमी थ्री पीन प्लगचा वापर करावा कुलर मध्ये पाणी भरण्यापूर्वी कुलरचा वीज पुरवठा बंद करून प्लग काढून ठेवावा म्हणजे कुलरचा विजेशी संबंध राहणार नाही पाणी भरताना ते टाकीच्या खाली सांडुन बाजूला जमिनीवर पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी. पाणी भरल्यानंतर प्लग पिन लावून स्विच चालू करावे त्यानंतर कुलरच्या कुठल्याही भागाला स्पर्श करू नये कुलरचे कनेक्शन व वायरिंग अधिकृत कारागिराकडून तपासून घ्यावी.
काय काळजी घ्यावी
- अर्थिंग ची तपासणी करून घ्यावी अर्थिंग व्यवस्थित असल्यास लिकेज करंट येत नाही. कुलरच्या खाली वायर पाण्यामध्ये बुडणार नाही याची काळजी घ्यावी.
- पंपातून पाणी येत असल्यास वीजपुरवठा बंद करून नंतरच कुलरला हात लावावा. ओल्या हाताने कुलरला कधी स्पर्श करू नये लहान मुलांना नेहमी कुलर पासून सुरक्षित अंतरावर ठेवावे आणि ती कुलर जवळ खेळणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी.
कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीज प्रवाह उतरतो यासाठी कुलरचा थेट जमिनीशी संपर्क येईल अशी व्यवस्था करावी जेणेकरून कुलरच्या लोखंडी बाह्यभागात वीज प्रवाह उतरल्यास त्याचा धक्का बसणार नाही.
कुलर मधील पाण्याचा पंप पाच मिनिटे सुरू आणि दहा मिनिटे बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करावा यामुळे विजेचाही बचत होते कुलर बाबत माहिती नसल्यास कनेक्शन बद्दल करू नये कुलरची दुरुस्ती चालू अवस्थेत न करता प्लग काढून नंतरच काम करावे.
कुलरच्या प्लग ला जोडलेली वायर खंडित व जीर्ण झालेली असल्यास बदलून दुसरी लावण्यात यावी कुलर हलवताना प्लग पीन बाहेर काढून नंतरच त्याची हालचाल करावी.
कुलर ला पण पण अधून मधून बंद करावा घरामध्ये अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसून घ्यावे आपल्या दैनंदिन व्यापापासून थोडासा वेळ या उपायोजनासाठी दिला तर कुलर मुळे होणारे अपघात टळू शकतात त्यामुळे आजच या उपायोजितची अंमलबजावणी करण्याची आव्हान महावितरण केले आहे.
0 Comments