/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> फुलवाडी शिवारातून बैल जोडी लंपास, पशुपालकासह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी

Hot Posts

फुलवाडी शिवारातून बैल जोडी लंपास, पशुपालकासह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी

फुलवाडी शिवारातून बैल जोडी लंपास, पशुपालकासह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी


धाराशिव : शेतात बांधलेले दोन बैल चोरट्यांनी लंपास केली ही घटना तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी शिवारात घडली या प्रकरणी नळदृग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फुलवाडी परिसरात जनावरे चोर टोळी सक्रिय झाल्याने पशुपालकासह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील रहिवाशी धनराज विलास घोडके वय (46) यांची फुलवाडी शिवारात शेती आहे. त्यांनी त्यांची बैल जोडी 22 मे रोजी शेतातील गोठ्यात बांधली होती चोरट्याने संधी साधून रात्रीच्या वेळी ही 70 हजार रुपये किमतीची बैल जोडी चोरून नेली ही घटना 22 मे रोजी रात्री नऊ ते 23 मे रोजी पहाटे पाच या कालावधीत घडली. याप्रकरणी घोडके यांनी बैलजोडीचा सर्वत्र शोध घेतला परंतु कुठेही बैल जोडीचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी रविवारी दिनांक १ रोजी पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी फिर्यादी दिली त्यावरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>