Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमध्ये युवक प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन

धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमध्ये युवक प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन


धाराशिव /प्रतिनिधी-रूपेश डोलारे : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथे दिनांक ४ जुलै रोजी वाणिज्य विभागामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त जिल्हा उपनिबंधक कार्यालय धाराशिव, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या मार्फत युवक प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य श्री. नन्नवरे सर व उपप्रचार्य श्री. एस. के. घार्गे सर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

     यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन सहकाराचे महत्त्व  सांगितले. विद्यार्थ्यांनी विविध सहकारी संस्थांचा अभ्यास करावा असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री. डी. एस. जाधव साहेब, कार्यालय अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था, धाराशिव यांनी महाराष्ट्रामध्ये सहकाराची सुरुवात कशाप्रकारे झाली व सहकाराचे महत्त्व विविध क्षेत्रांमध्ये कशाप्रकारे वाढत गेले याविषयी माहिती दिली. तसेच सहकारी बँकांचे कार्य व सेवा याबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे, श्री. अतुल कुलकर्णी, लेखाविभाग, जिल्हा उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था धाराशिव, श्री. मधुकर जाधव साहेब, जिल्हा सहकार विकास अधिकारी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे तसेच कॉलेजमधील प्राध्यापक श्री. एस. के. कापसे, सौ. एस. एल. जाधव, सौ. एस. शेळके, श्री. आर. एस. भोसले, श्री. एल. एस. शिंदे आणि वाणिज्य शाखेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षण मेळाव्यास आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री.सुधीर (आण्णा) पाटील, संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अदित्य भैय्या पाटील, प्रशासकिय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. एस. के. कापसे यांनी केले.

Post a Comment

0 Comments