गॅस कटकरच्या साह्याने बँकेची तिजोरी फोडून 19 लाखाची रोकड लंपास ,महाराष्ट्र ग्रामीण बँकेत धाडसी चोरी, सीसीटीव्ही कॅमेरावर मारली स्प्रे
धाराशिव प्रतिनिधी /रुपेश डोलारे;: उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा फोडून अज्ञात चोरट्याने 19 लाख 31 हजार 349 रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडली ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली या धाडसी चोरीच्या घटनेमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 01.00 ते 04.15 वाजेच्या सुमारास उमरगा तालुक्यातील नाईचाकुर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखेवर अज्ञात तिघा चोरट्यांनी धाड टाकली. बॅकेच्या चॅनेल गेटची कुलुपे तोडून आत प्रवेश करत त्यांनी तिजोरी गैस कटरने कापली व तब्बल ₹19,31,349 किंमतीचा रोख माल चोरून नेला. शाखाधिकारी अशिष नागनाथ बनसोडे (वय 30, रा. चिवरी, ता. तुळजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 331(1), 305(अ)(इ), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरा वर स्प्रे मारून केली चोरी
बँकेच्या कार्यालयात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत परंतु चोरट्याने आत प्रवेश करताच सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरा वर स्प्रे मारून आज प्रवेश केला त्यामुळे हे चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले नाहीत गावातील कॅमेरे ही बंद होते त्यामुळे संबंधित कॅमेरे ही उपयोगी ठरले नाहीत, या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी श्वान पथकास प्रचारण केले होते मात्र बँकेच्या परिसरातच घुटमळत राहिले त्यामुळे या माध्यमातून कोणताही पुरावा हाती लागला नसल्याचे समजले तसेच चोरट्याने बँकेची तिजोरी गॅस कटरच्या साह्याने फोडली तिजोरी तुटल्यानंतर चोरटे रोकड घेऊन पसार झाले सोबत आणले गॅस कटर सिलेंडर मात्र जागेवरच सोडले.

0 Comments