शिक्षकच निघाला भक्षक : फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना-Ahilyanagar Crime New Shrigonda Police Station

Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षकच निघाला भक्षक : फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना-Ahilyanagar Crime New Shrigonda Police Station

शिक्षकच निघाला भक्षक : फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना- 


अहिल्यानगर/प्रतिनिधी रूपेश डोलारे  : श्रीगोंदा तालुक्यातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवर विद्यालयाच्या प्राध्यापकांनी विद्यार्थिनीला तसेच तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या फिर्यादीवरून संबंधित प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संबंधित प्राध्यापकास ताब्यात घेण्यात आले असून या घटनेने शिक्षण व्यवस्थेत एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पिडीत  मुलगी ही श्रीगोंदा शहरातील नामांकित शिक्षण संस्थेच्या विद्यालयात शिक्षण घेत होती या विद्यालयात तील कॉन्ट्रॅक्ट बेस वर असलेल्या प्राध्यापकांनी पीडित मुलीला आमीष दाखवत तिच्याशी जवळीक साधली तिच्याशी लगट करण्यास सुरुवात केली ; या घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास तिच्यासह आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्याकडे असलेल्या फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडित मुलीवर जानेवारी 2025 पासून वेगवेगळ्या हॉटेलवर घेऊन जात बळजबरीने लैंगिक अत्याचार करण्यात येत होता.

पीडित मुलगी मागील पाच-सहा दिवसांपूर्वी शाळेत गेल्यानंतर घरी माघारी न आल्याने पालकांनी मुलीची शोधा शोध करत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मुलगी हरवली असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीचा दोन दिवस शोध घेत मुलगी पालकांच्या ताब्यात दिले पालकांनी मुलीला याबाबत विचारले असता घाबरलेल्या मुलीने काहीच सांगितले नाही मात्र विश्वासात घेतल्यानंतर पीडित मुलींनी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती सांगितली यावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात प्राध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments